? धक्कादायक..अचानक विजेचा खांब पडून तरुणाचा जागीच मृत्यू…
प्रतिनिधी सुरगाणा:विजय कानडे
सुरगाणा तालुक्यातील गरीब होतकरू तरुण व्यक्ती छोटासा व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करत असे परंतु रस्त्याने दुचाकी वाहन घेऊन जात असतांना अचानक महावितरण वीजाच्या पोल पडून त्याचा जागीच मृत्यू झाला ,तसेच त्याचा सहकारी वीजेचा तारांचे करंट लागून लांब फेकला गेला.महाराष्ट्रात रस्त्याचा आजूबाजूला लाईट पोल असतात पण महाराष्ट्रातील महावितरण अधिकारी सक्षम आहात का अशा प्रश्न देखील नागरिकांना पडत आहे.तसेच त्याच दुचाकी वाहनावर जात असलेल्या दुसरा सहकारी याचा जीव वाचला. पुढील तपास सुरगाणा पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी करत आहे.






