Amalner

अमळनेर तालुक्यातील अवैध दारू विक्री..राज्य उत्पादन शुल्क विभागाची मेहरबानी ?काय आहे साटे-लोटे ?

अमळनेर तालुक्यातील अवैध दारू विक्री..राज्य उत्पादन शुल्क विभागाची मेहरबानी ?

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर तालुक्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉक डावून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्यात देशी दारू अवैध मार्गाने आणि पद्धतीने सुरू आहे.फक्त अमळनेर च नव्हे तर पारोळा चोपडा तालुक्यात देखील बेकायदेशीर रित्या दारू विक्री सुरू आहे.

अमळनेर तालुक्यातील मारवड येथील श्री व्ही सी पाटील यांचे दू नं CL III 17 हे देशी दारूचे दुकान घरातच सुरू ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दारू विकताना घ्यावयाची काळजी हा विषय दूर दूर पर्यंत आढळून येत नाही. त्यातील मुद्दे खालील प्रमाणे

  • मद्य विकणाऱ्या ला जसा विक्री करण्याचा परवाना आवश्यक असतो तसाच परवाना मद्य खरेदी करणाऱ्या कडे असणे आवश्यक असते. सदर दुकानात कोणत्याही ग्राहकाचा मद्य प्राशन करण्याचा परवाना विचारला जात नाही,पाहिला जात नाही. हा सर्वात मोठा नियम भंग असून बेकायदेशीर पणे मद्य विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • या दुकानातून सर्रास पणे खोक्यांमध्ये दारूच्या बाटल्या ह्या शहरात मोठ्या संख्येने आणल्या जात आहेत. साधारणपणे एका दिवसांत मारवड येथील वरील देशी दारूच्या दुकानातून शहरात 30 ते 40 दुचाकी वाहनांवरून बेकायदेशीर रित्या दारू आणली जाते.एका खोक्यात किमान 10 ते 12 बाटल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. एक व्यक्ती साधारणपणे 10 ते 12 खोके पार्सल आणत असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • विक्री करत असतांना कोणत्याही प्रकारची आरोग्यासाठी आवश्यक काळजी घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हातात मोजे नाही,चेहऱ्यावर मास्क नाही,सुरक्षित अंतर नाही,सॅनिटायझर ची व्यवस्था नाही,अश्या गोष्टी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आढळून आल्या आहेत.
  • विशेष म्हणजे या दुकानात दारूची बाटली फोडून त्यात अर्धे सॅनिटायझर टाकले जात असल्याचे तसेच क्लिनर नाव लिहलेले औषध टाकले जात असल्याचे समोर आले आहे. ह्यातील जवळपास सर्वच मद्य हे डुप्लिकेट किंवा शरीरास घातक असल्याचे दिसून आले आहे. इसरा नावाचे भयानक औषध मिसळून तयार केलेली ही दारू सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी अत्यन्त हानिकारक असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व प्रकारच्या शासकीय नियमांचे उल्लंघन करत सुरु असलेले हे दुकान राज्य उत्पादन शुल्कच्या मेहरबानी मुळे सुरू असून अमळनेर येथील राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी या दुकानावर कार्यवाही करण्यास असमर्थ असल्याचे भ्रमण ध्वनी वरून झालेल्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.आता ही मद्याची शाळा भरविणारे लोकांच्या आरोग्याशी खेळणारे दारू विक्रेते दोषी की त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी दोषी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असंही राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्षानुवर्षे काहीच काम करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक लोकांना माहीतच नाही की दारू बंदी विभाग अस्तित्वात आहे आणि ते कार्यवाही करतात याची माहिती च सामान्य जनतेला माहीत नाही. तसेच अमळनेर शहरात दारू बंदी विभाग कार्यरत आहे याची देखील माहिती अमळनेर तालुक्यातील जनतेला नाही.कारण आज पर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही या विभागाने केलेली नाही.उठसुठ पोलीस विभागाकडे च दारू बंदी चा विषय जातो आणि तेच लोक कार्यवाही करत असतात.असे एकूण चित्र तालुक्यात आहे.

आज स्पष्टपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर दुकानावर कार्यवाही करण्याचे टाळले असून तुम्ही मुख्य कार्यालयात तक्रार करा असे अमळनेर येथील राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी रिंकेश दांगट यांनी भ्रमण ध्वनी वरून सांगितले आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो आहे की तालुक्यातील लहान लहान दुकान दारांची तक्रार जर वरिष्ठ कार्यालयातच करायची आहे मग येथील अधिकारी आणि कार्यालयाची अमळनेर ला काही गरजच नाही. असेही हा विभाग इथे काही काम करतच नाही.मग हे कार्यालय आणि येथील अधिकारी कर्मचारी यांना शासकीय काम करायचं च नसेल तर मग त्यांचे कार्यालय तरी का असावे हा देखील एक भाबडा प्रश्न उपस्थित झाला आहे.

चल गज्या करू मजा। म्हणत राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी, कर्मचारी यांचे चांगलेच साटे लोटे असल्याचे निदर्शनास आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button