Chopda

समस्यांकडे बघण्यासाठी वेगळा दृष्टिकोन हवा – संजय बारी तांदळवाडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी जरा हटके सुसंवाद

समस्यांकडे बघण्यासाठी वेगळा दृष्टिकोन हवा – संजय बारी
तांदळवाडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी ‘जरा हटके ‘ सुसंवाद

समस्यांकडे बघण्यासाठी वेगळा दृष्टिकोन हवा - संजय बारी तांदळवाडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी जरा हटके सुसंवाद

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
आयुष्यातील समस्यांकडे पारंपरिक विचारधारेतून न बघता वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास विधायक असे जरा हटके कार्य घडू शकते, असे प्रतिपादन जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडी येथील श्रींच्या गणेशोत्सव कार्यक्रमांतर्गत घेतल्या गेलेल्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद -‘जरा हटके ‘ या व्याख्यान प्रसंगी संजय बारी यांनी केले.         

समस्यांकडे बघण्यासाठी वेगळा दृष्टिकोन हवा - संजय बारी तांदळवाडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी जरा हटके सुसंवाद

 

सुरूवातीला मनोरंजक खेळातून विदयार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांनी डोंगर खोदून रस्ता तयार करणारे मांझी, स्टीफन हॉकिन्स, पोटदुखी मागील पाण्याची समस्या ओळखून गावातून प्लास्टिक बाटल्या गोळा करून घरुन शुद्ध पाणी नेत समस्येवर उपाय शोधणारे जि.प. शिक्षक अशी विविध जरा हटके उदाहरणं देत आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे, आपल्या आजूबाजला घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे, वेगळ्या नजरेने बघावे असे विदयार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
         तांदळवाडी हायस्कूलच्या गणेशोत्सव कार्यक्रमांत सुंदर हस्ताक्षर, श्री गणेश चित्र रंग भरण, श्रीगणेश२१ नावं शोध शब्दकोडे, मराठी चुटकुले, श्रीगणेशा विषयी सामान्य ज्ञान, शेला पागोटे अश्या विविध स्पर्धा तसेच व्याख्यान अशा स्वरूपात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणारे उपक्रम राबविले जात आहेत.
         या व्याख्यानप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, वक्ता परिचय मुख्याध्यापक विलास पाटील यांनी तर अतिथी स्वागत ए.एल. चव्हाण यांनी व आभार एस्. जी. पाटील यांनी मानलेत. या जरा हटके सुसंवादास सर्व शिक्षकवृंद व विदयार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button