Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील  पोलिस पाटलांना मनसेची मदत प्रत्येकी दोन लाख रुपये विम्याचे कवच

पंढरपूर तालुक्यातील पोलिस पाटलांना मनसेची मदत प्रत्येकी दोन लाख रुपये विम्याचे कवच

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर,ता 28: कोरोना विरोधात प्रशासकीय पातळीवर सर्वच अधिकारी आणि कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लोकांच्या सुरक्षेसाठी राबत आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातात घालून गावोगावचे पोलिस पाटील देखील आपापल्या गावात कोरोनाला दूर ठेवण्याची रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.कोरोना वारियर्सचा भाग ठरलेल्या तालुक्यातील पोलिस पाटलांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दोन लाख रुपयांच्या विम्याचे सुरक्षा कवच दिले आहे.प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत आज तालुक्यातील सर्व पोलिस पाटीलांना फेसशिल्ड आणि सानिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी तालक्यातील सुमारे 70 पोलिस पाटलांचा दोन लाख रुपयांचा सुरक्षा विमा पाॅलाशी काढण्याचे काम देखील सुरु कऱण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आरोग्य अधिकारी,कर्मचारी, महसूल प्रशासन, पोलिस आणि गाव पातळीवरील ग्रामस्तरीय समित्यांच्या माध्यमातून कोरोना विषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत. यांच्या बरोबरच प्रत्येक गावातील पोलिस पाटलांची भूमिका देखील तितकीच महत्वाची ठरली आहे.
पोलिस पाटील हे पद सामाजिक कार्याबरोबरच प्रशासनाला मदत करण्यासाठी निर्माण केले आहे. तरीही स्वतःला झोकून देवून तालुक्यातील सर्व पोलिस पाटील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातात घालून काम करत आहेत.पोलिस पाटलांना शासनाकडून कोणतीच सुरक्षेची साधने मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिस पाटलांना आवश्यक त्या साधने आणि सुविधांची गरज होती. हीच गरज ओळखून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज तालुक्यातील 70 पोलिस पाटलांना फेस शिल्ड, सॅनिटायझरसह अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले.यावेळी त्यांना दोन लाख रुपये सुरक्षा विमा पाॅलीशी देखील काढण्याचे काम सुरु केले आहे.पोलिस पाटलांसाठी विम्याचे कवच देण्याचा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच मनसेच्या वतीने पंढरपुरात राबवण्यात आला आहे. यापूर्वी पंढरपुरातील सुमारे 150 हून अधिक पत्रकारांना विमा पाॅलीशी काढून त्यांना विम्याचे कवच दिले आहे.
मनेसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.यावेळी मनसेेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ, पंढरपूर शहर उपप्रमुख महेश पवार,सागर घोडके,समाधान डुबल,पोलिस पाटील संघटनेच्या तालुका अध्यक्ष साधना देठे, माधुरी नागटिळक,सोमनाथ निंबाळकर, सागर जमदाडे, आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button