भिंत कोसळून मयत झालेल्या अभंगराव कुटुंबीयांना मनसेची २५ हजारांची मदत..
मनसेकडून अभंगराव कुटुंबीयांची उतरवली ५ लाखांचा विमा पाॅलिसी
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर – मुसळधार पडलेल्या पाऊसामुळे पंढरपूर चंद्रभागेला महापूर आल्याने चंद्रभागा नदी पात्रातील कुभार घाटाजवळील नव्याने बांधण्यात आलेला घाट खचल्याने या ठिकाणी राहणार्या अभंगराव कुटंबातील 4 जणांचा ठिगार्याखाली दबून जागीच मृत्यू झाला होता.या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन आर्थिक मदत जाहीर केली आहे.मात्रा शासनाची मदत मिळाण्या आगोदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज मयत अभंगराव कुटुंबाची संत्वनपर भेट घेऊन रोख स्वरूपात २५ हजारांची आर्थिक मदत केली.त्याचबरोबर अभंगराव कुटुंबीयाची ५ लाखांची विमा पाॅलिसी देखील काढणार असल्याचे सांगितले.यावेळी दिलीप बापू धोत्रे यांनी घाट बांधकाम संबंधीत ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कडक कारवाई करण्यात यावी.तसेच कुटुंबातील कर्ते पुरूष मयत झाल्याने कुटुंबावर संकट अोढावले आहे.तरी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नौकरी देण्यात यावी अशीही मागणी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड,उपाध्यक्ष महेश पवार, नागेश इंगोले, प्रथमेश पवार, अभिजित डूब ल ,राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या1 तालुका अध्यक्ष अनिता ताई पवार इत्यादी उपस्थित होते






