Indapur

संतोष सावंत यांच्या कुटुंबाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी केले सांत्वन.

संतोष सावंत यांच्या कुटुंबाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी केले सांत्वन.

सावंत यांच्या कुटुंबीयांना सर्वोतपरी मदत करणार

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे –इंदापूर तालुक्यातील संतोष रामहरी सावंत रा.शेटफळ हवेली (ता. इंदापूर) वय 42 वर्षे यांचे ता. 29 रोजी आकस्मित निधन झाले असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घरी जावून सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले

यावेळी भरणे यांनी शासनाकडून मिळणारी मदत सावंत यांच्या कुटुंबियांना केली जाईल तसेच सावंत कुटुंबियांच्या पाठीशी कायमस्वरूपी व खंबीरपणे उभे राहणार असल्याचा शब्द राज्यमंत्री भरणे यांनी दिला.

सावंत हे केंद्रीय राखीव पोलिस दलातच्या सेवेत कार्यरत होते, त्यांनी 19 वर्षे व सात महिने सेवा केली आहे. त्यांचे आसाम- त्रिपुरा येथे आकस्मित निधन झाल्याने कळताच गावात शोककळा पसरली होती. ता. 2 रोजी शेटफळ हवेली येथे सावंत यांच्या पार्थिवावर सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button