Parola

राष्ट्रवादीच्या पारोळा बंद ठेवण्याच्या आव्हानाला व्यापारी मंडळींकडून शंभर टक्के प्रतिसाद

राष्ट्रवादीच्या पारोळा बंद ठेवण्याच्या आव्हानाला व्यापारी मंडळींकडून शंभर टक्के प्रतिसाद
पारोळा प्रतिनिधी कमलेश चौधरी

राष्ट्रवादीच्या पारोळा बंद ठेवण्याच्या आव्हानाला व्यापारी मंडळींकडून शंभर टक्के प्रतिसाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार आणि विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणात कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर भाजपा सरकारने सुडबूध्दीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करीत या करण्यात असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पारोळा शहरात बंद पाळण्यात आला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात जाणुन बुजून घेत त्यांच्यावर सरकारने सुडबूध्दीने व मनमानी कारभार चालवीत त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप यावेळी तहसीलदार ए.बी.गवांदेे यांना निवेदन देण्यात आले.पारोळा तालुका राष्ट्रवादीतर्फे यावेळी शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पारोळा शहरातील  ‘एकच वादा अजित दादा’व ‘एकच साहेब पवार साहेब’व राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचा विजय असो,या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय,सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है,भाजप शिवसेना युतीचा धिक्कार असो अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला.राष्ट्रवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून निघून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
  या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष  रोहन सतीश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  तालुका अध्यक्ष  बाळू नाना पाटील.जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील, डॉक्टर शांताराम पाटील, दिगंबर बापू पाटील,पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, पंचायत समिती सदस्य  अशोक पाटील,तालुका उपाध्यक्ष  राकेश पाटील,तालुका युवक अध्यक्ष  दिलीप पाटील,शहराध्यक्ष संजय बागडे,उपाध्यक्ष दीपक पाटील, अभिषेक पाटील ,वेल्हाणे येथील सरपंच  ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील,ईश्वर पाटील, योगेश रोकडे  तसेच  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते  व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते  
  कार्यकर्त्यांनी पारोळा व्यापारी मंडळींना बंद ठेवण्याचे आव्हान केले.या आव्हानाला व्यापारी मंडळींनी प्रतिसाद देत आज पारोळा शहरातील संपूर्ण दुकाने बंद ठेवून सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button