संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी निमीत्त किर्तनाचे आयोजन
सुरेश बागडे
परंडा(सा.वा)
दर सालाबादाप्रमाणे श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी दि. ११ रोजी ( मंगळवार ) रोजी परंडा सराफ व सुवर्णकार असोसियन तालुका सोनार समाजाच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार असुन या निमीत्त किर्तन व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

परंडा शहरातील कल्याणसागर बॅकेजवळ चिंतामणी यांच्या मातोश्री निवास येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची पुजा करुन दुपारी १२ वा.नरहरी मंदिरात पुष्पवृष्टी,गुलाल उधळण्याचा व भजन,भोजननाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ह.भ.प. बालाजी बोराडे महाराज यांचे किर्त होणार आहेे. वारकरी मंडळ व सर्व बाल वारकरी वृंदाची टाळ ,ढोल मृदंगाच्या गजरात भव्य कार्यक्रम उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमास सर्व समाजातील बांधवांनी, भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन परंडा सराफ व सुवर्णकार असोसियनने केले आहे.






