कांदलगावात जिजाऊ-सावित्री संयुक्त जयंती साजरी
प्रतिनिधी दत्ता पारेकर
ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने जिजाऊ-सावित्री जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ.पुष्पाताई रेडके उपस्थित होत्या,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई पाटील या होत्या.सर्वप्रथम पंचायत सभापती सौ.पुष्पाताई रेडके व माजी जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई पाटील यांच्या हस्ते जिजाऊ-सावित्री प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गरोदर महिलांचे सामुदायिक ओटीभरण कार्यक्रम,महिलांसाठी स्वयंरोजगारासाठी शिवण क्लास प्रशिक्षण,तसेच भव्य हळदी-कुंकू व स्वच्छतेचे वाण म्हणून डस्टबीन वाटप आयोजित करण्यात आले होते.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांना गावातील महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत कांदलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रमांतर्गत शिवण क्लास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना सभापती सौ.रेडके म्हणाल्या की ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने आयोजित केलेले उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत ,वेगवेगळे उपक्रम राबवण्यामध्ये कांदलगाव ग्रामपंचायत नेहमीच अग्रेसर असते.ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका महिला असल्यामुळे महिलाविषयक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात,यावेळी ग्रामसेविका श्रीमती.स्वाती लोंढे यांचा सत्कार सभापती सौ.रेडके यांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात सौ.ऋतुजाताई पाटील म्हणाल्या की सामुदायिक ओटीभरणाचा कार्यक्रम ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेविका यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आला आहे,तो अतिशय स्तुत्य आहे.यापुढे दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत म्हणून सुकन्या समृद्धी योजनेतुन प्रथम कन्या अपत्याच्या नावे रूपये एक हजाराची ठेव ठेवण्यात येणार आहे.सरपंच श्री.रविंद्र पाटील म्हणाले की,प्रत्येक घरी शिवबा जन्माला यावा असं वाटत असेल तर आधी प्रत्येक घरी जिजाऊ जन्माला यायला हवी.मुलगा आणि मुलगी असा भेद न करता मुलींनाही चांगले शिक्षण प्रत्येक पालकांनी दिले पाहिजे.यावेळी स्वप्नाली सरडे,दिपाली ननवरे,अश्विनी सरडे,लक्ष्मी सरडे,माधुरी सरडे या महिलांचा ओटीभरणाचा कार्यक्रम सभापती सौ.रेडके,माजी जि.प.सदस्या सौ.ऋतुजा पाटील,सौ.पद्मजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी युवा नेते महेंद्र रेडके, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.कमल राखुंडे,सदस्या सौ.रेखा बाबर,सौ.सुवर्णा तुपे,सौ.तेजमाला बाबर,ग्रामपंचायत सदस्य उल्हास पाटील,किसन सरडे,बाळू गिरी,बाळू राखुंडे,दशरथ बाबर,शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सुषमा घारगे,श्री.टाकळीकर तसेच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पांडुरंग इंगळे,राजु मदने,संतोष बाबर यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलोफर पठाण यांनी केले.प्रास्तविक,संपूर्ण नियोजन व आभार प्रदर्शन ग्रामसेविका श्रीमती.स्वाती लोंढे यांनी केले.






