पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील पूर आलेल्या भागातील स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
प्रतिनिधी रफीक आत्तार
उजनी व वीर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने या दोन्ही धरणातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली व गेल्या दोन दिवसापासून शहराच्या सखल भागांमध्ये विविध ठिकाणी पुराचे पाणी आले होते. काल रात्री पुर ओसरल्यानंतर शहराच्या विविध भागात रस्त्यावर कचरा व गाळ साचून राहिला होता त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते आज सकाळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर ,आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे ,नागनाथ तोडकर नगरअभियंता नेताजी पवार यांचे समवेत सर्व भागाची पाहणी केली व संतपेठ भाग,डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर,विठ्ठल नगर, प्रदक्षिणामार्ग, जुनी पेठभाग व्यास नारायण झोपडपट्टी अंबाबाई झोपडपट्टी लखुबाई झोपडपट्टी गोविंदपुरा, नदीकाठचे सर्व घाट,नदीवरील 2 पूल व स्मशान भूमी तीन अग्निशामक द्वारे प्रेशरद्वारे पाणी मारून स्वच्छ करण्यात आले तसेच 350 सफाई कर्मचारी ,दोन फळीचे ट्रॅक्टर,दोन जेसीबी, 3 ट्रॅक्टर द्वारे ज्या ठिकाणी पुराचे पाणी आले होते त्या ठिकाणी युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेऊन सुमारे 60 ते 70 टन कचरा उचलण्यात आला व ही मोहीम आठवडा भर सुरू ठेवून स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहीती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली तसेच मलेरिया विभागाचे हिवताप अधिकारी किरण मंजुळ यांनी मलेरिया विभाग कडील 50 कर्मचाऱ्यांच्या द्वारे हात पंप द्वारे फवारणी करून घेतली आहे,सदरची कामे नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव ,उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर ,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे व इतर सर्व नगरसेवकांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आली.






