आज बोराडी येथील देवमोगरा माता मंदिरात जय आदिवासी युवा शक्ती(जयस), आदिवासी टाईगर सेना (ATS), बिरसा ब्रिगेड-सातपुडा (BBS) यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव जयपाल सिंह मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
राहुल साळुंके धुळे
धुळे : आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या जयपालसिंह मुंडा जी यांच्या जयंती निमित्त नमन
आदिवासी शब्दासाठी व आदिवासींच्या अधिकार व हक्कासाठी जयपाल सिंह मुंडा यांनी आदिवासी समाजाची बाजू मांडली. व आदिवासींना न्याय मिळवून दिला.परंतु त्याचवेळी आदिवासींच्या विनाशाची देखील सुरुवात झाली होती. राज्यघटनेतून आदिवासी/aborigine शब्द वगळण्यास जयपाल सिंह मुंडा यांनी प्रखर विरोध केला.
कारण आदिवासींमधे म्हणजेच आदिवासींकरीता म्हणून तयार केलेल्या ‘अनुसूचित जमाती’ या यादीत बिगरआदिवासींना घुसवुन आदिवासी समाजाचे’ स्वतंत्र नाव व स्वतंत्र सामाजिक अस्तिव नष्ट करून त्याजागी आदिवासींचे येथील मूळ रहिवासी/आदिवासी/aborigine हे स्टेटस मिटवुन टाकण्याचे षढयंत्र ते ओळखून होते. घटना समितीत ते एकटे पडले इतरांनी त्यांना पाठिंबा दिला नाही.आदिवासींचे अस्तित्व,स्टेटस नाकारले गेले,आणि ‘अनूसूचित जमाती ‘ या यादीत अनेक बिगरआदिवासी जाती जमाती घुसविल्याचा इतिहास समोरच आहे व त्या आधारावर बोगस आदिवासीही खऱ्या आदिवासींच्या राखीव जागा व अन्य हक्क इतरांच्या घशात घातल्या जात असल्याचे आपण पाहता आहात,अनुभवता आहात.
बंधुंनो आदिवासी महापुरुषांचा खरा इतिहास शोधा ! authentic रेकॉर्ड्स अभ्यासा.त्यातून सत्य काय आहे ते जाणून घ्या ! कोणत्याही पोस्ट न वाचताच फॉरवर्ड करून आदिवासी समाजाची हेतुपुरस्पर केल्या जाणाऱ्या बदनामीचा आपण स्वतःच प्रचार करू नका.






