Pandharpur

पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्याचे मोठी कारवाई

पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्याची मोठी कारवा

रफिक आतार

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शिरढोण या गावी चोरून अवैध रीतीने हातभट्टी दारू तयार करीत असले बाबत बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री प्रशांत भस्मे यांच्या आदेशाने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे कडील पोलीस पथक मौजे शिरडोण गावाच्या दक्षिणेकडील असलेल्या सरकारी ओढ्यात गेले असता तेथे माहिती मिळाली की अनिलराव सुरेश अधटराव व देविदास सुरेश अधटराव हे दोघे हातभट्टी तयार करण्याचे रसायन जवळ बाळगून अवैध हातभट्टी दारू तयार करीत आहेत पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना सोबत घेऊन बातमीचे ठिकाणी गेलो असता तेथे एक इसम आपल्या हातातील लाकडी दांड्याने प्लास्टिक बारमध्ये काहीतरी घुसळत असल्याचे दिसल्याने आम्ही त्याला पकडणे करिता जात असताना तो आम्हाला पाहून काटेरी झाडात पळून गेला.

सदर ठिकाणी सात प्लास्टिकचे बॅरल मिळून आले मध्ये अंदाजे 100 लिटर असे एकूण सातशे लिटर आंबट उग्र वासाचे रसायन मिळून आल्याने त्यातील 180 मिली रसायन सॅम्पल करता काढून घेऊन उर्वरित रसायन जागीच नष्ट केले दरम्यान गावातील याच ओढ्यामध्ये गावातील रेवाप्पा घंटे नावाचा इसम देखील अवैध दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्याने जवळ असलेल्या बातमीचे ठिकाणी गेलो असता तेथे असलेल्या इसम आम्हाला पाहून लागलीच पळून गेला त्याठिकाणीदेखील आंबा उग्र वासाचे सहा बॅरल मध्ये प्रत्येकी 100 लिटर याप्रमाणे 600 लिटर आढळून आले त्यातील देखील 180 मिली करिता काढून उर्वरित रसायन घेऊन जाणे वाहतूक करणे शक्य नसल्याने जागीच नष्ट करण्यात आले आहे तरी सदर बाबत चौकशी करिता सदर अवैध हातभट्टी दारू ही अनिल सुरेश अधटराव व देविदास सुरेश अधटराव तसेच दुसऱ्या ठिकाणी असलेला रेड केलेला दारूचा व्यवसाय रेवाप्पा गौरप्पा घंटे सर्व राहणार शिरडोन तालुका पंढरपूर हे करीत असल्याबाबत माहिती मिळाली आहे वरील तिन्ही इमाजाविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डोंगरे व कदम हे करीत आहेत वरील अवैध धंद्याविरुद्ध पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे कडील
ए एस आय कदम, डोंगरे पो. कॉन्स्टेबल आसबे, नलवडे, बाबर यांनी केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एकुण 39 हजार रुपये किमतीचे तेराशे लिटर आंबट उग्र वासाचे रसायन नष्ट करण्यात आले असून यापुढे देखील विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button