रावेर

जुनी पेंशन मागणीसाठी रावेर तालुक्यात कर्मचारी एक दिवसाच्या संपावर

जुनी पेंशन मागणीसाठी रावेर तालुक्यात कर्मचारी एक दिवसाच्या संपावर

जुनी पेंशन मागणीसाठी रावेर तालुक्यात कर्मचारी एक दिवसाच्या संपावर

रावेर प्रतिनिधी विलास ताठे
तालुक्यातील शिक्षण,महसूल,आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुकारला एक दिवसाचा संप, मागण्यां मान्य न झाल्यास 11सप्टेंबर पासून बेमुद्त संप होणार
               जुनी पेंशन योजना लागू करा,या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांबाबत रावेर तालुक्यातील शिक्षण,आरोग्य, महसुल, वनविंभाग इत्यादीं हजार च्या वर कर्मचाऱ्यांनी आज 9सप्टेबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला.! संपामुळे तालुक्यातील अनेक शाळा, विद्यालय,कार्यालय येथे शुकशुकाट होता.! रावेर पंचायत समिति आवारात कर्मचाऱ्यांनी दिवसभर धरणे प्रदर्शन करीत गटविकास अधिकारी ,गटशिक्षणाधिकारी ,  तहसीलदार  यांच्याकड़े मुख्यमंत्र्यांच्या नावे संपात सहभाग घेत,2दिवसात मागण्यां मान्य न झाल्यास आगामी 11 सप्टेंबर पासून कर्मचारी बेमुदत संपावर  जाणार असल्याचे निवेदन सादर केले.
                  या राज्यव्यापी संपात आज राज्यातील 35 पेक्षा जास्त शासकीय, निमशासकीय कर्मचारी,जिल्हा परिषद,महसूल,आरोग्य,लिपिक वर्गीय कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनां सहभागी झाल्या.या सर्व संघटनांच्या समन्वय समितीने आज निवेदन सादर करीत 1नोव्हेंबर2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना पूर्वीची जुनी पेंशन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह सातव्या वेतना आयोगातील त्रुटि दूर करणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे, केंद्रा प्रमाणे वेतनभत्ते,इत्यादि 11 मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना  सादर केले. 1नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना शासनाने पूर्वीची जुनी पेंशन रद्द करून नवीन अन्यायकारक नवीन पेंशन लागु केली आहे, ज्यात कर्मचारी मयत झाल्या नंतर कोणत्याही प्रकारची फॅमिली पेंशन आणि ग्रैज्युटी मिळत नाही, तसेच निवृत्ति नंतर किती पेंशन मिळेल हे ही निश्चित नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमधे असंतोष आहे.. 
       यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री कैलास घोलाणे, श्री विनायक चौथे,श्री विजय गोसावी,श्री जितेंद्र गवळी, , प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री निलेश पाटील, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद चे श्री रविंद्र बखाल ,दत्तात्रय तायडे , अखिल रावेर प्राथमिक शिक्षक संघाचे श्री संजय कोळी शिक्षक भारती संघटनेचे श्री विजय पवार,पदवीधर संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री भूषण चौधरी, प्राथमिक शिक्षक संघाचे श्री सुरेश इंगळे,केन्द्रप्रमुख श्री हरीश बोंडे, उर्दू शिक्षक संघटनेचे श्री गौस खान, अय्युब सर,तसेच कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री उमेश दांडगे,तालुकाध्यक्ष श्री पुंडलिक पाटील,शिक्षक समिति तालुकाध्यक्ष श्री हर्षवर्धन तायड़े ,श्री दिलीप पाटील,श्री प्रकाश महाजन तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि तालुक्यातील हजारों डीसीपीएस धारक ,शिक्षक व शिक्षिका व कर्मचारी संपात सहभागी झाले.

संबंधित लेख

One Comment

Leave a Reply

Back to top button