प्रधानमंत्री आवास योजना घरकुल सर्वांना मिळालीच पाहिजे. नागेश पवार सचिव आम आदमी पार्टी
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : आम आदमी पार्टी नागरिकांच्या बरोबर
आहे. प्रधानमंत्री आवास योजना चा प्रकल्प हा पुर रेषेमध्ये बांधला जात आहे याबाबत आनेक नागरिकांनी व पत्रकार बंधूंनी सत्ताधारी यांच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु ना विधानसभा आमदार आणि ना विधान परिषद आमदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. कारण याची जबाबदारी कोणी स्विकारायाची.तात्कालीन आमदार हे कॅग्रेसचे आणि विद्यमान विधान परिषद आमदार भाजपाचे,आणि सत्ता भाजपची,आणि तात्कालिन आमदार भाजपाच्या संपर्कात,त्यामुळे खंबीरपणे विरोध करायचा कोणी.कारण दोघांन मध्ये काही मुद्दे वगळून सर्व नुरा कुस्त्याच होत्या.परंतु काही जरी असले तरी गरीब गरजूंना त्यांच्या हाक्काची घरे ही माळालीच पाहीजे. याला कोणीही सत्तेचा विद्यमान सरकारचा फायदा घेत चालत्या गाडीला वंगण करण्याचा प्रयत्न करु नये.आणि श्रेय वाद तर मुळीच कर नये.आपण काय करताय हे सर्व जाणकार नागरीक पाहत आहेत. आणि यामध्ये कोणी अडथळा आणु पाहत असतील तर हेच नागरीक तुम्हाला धडा शिकवतील. ज्याने सत्तेचा फायदा घेत घिसाड घाईने श्रेयवादासाठी या प्रकल्पाला चुकीची जागा निवडली त्या सत्ताधारी आणि ज्याने आमदार असताना चुकीच्या कामाला खंबीरपणे विरोध केला नाही यांना म्हणावे तरी काय?कशासाठी हे लोक नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असतील? हा प्रकल्प बंद पाडण्याचा डाव काही सत्ताधारी व महाराष्ट्र दरबारी सत्ता असलेच फायदा घेत आहेत. परंतु प्रकल्प बंद पाडण्यापेक्षा दुरुस्त्या करता येतायत का हे पाहिले पाहीजे,उगीचच प्रकल्पाची बदनामी केली तर अर्थीक गोष्टी संदर्भात खुप गंभीर परिणाम सहण करावे लागतील ,आणि सर्व झालेला कोट्यावधीचा खर्च पाण्यात जाईल.त्यामुळे काही दुरुस्त्या करता येतायत का हे पाहीले पाहीजे. आणि जो जास्तीचा खर्च येईल तो जे दोषी आहेत त्यांच्या मानधन व पगारातुन वसुल करावा.आता ज्या इमारती उभ्या आहेत त्याचे नुकसान न करता ज्या इमारती उभा करावयाच्या आहेत त्याची जागा बदलावी व तो प्रकल्प नविन कोर्ट च्या मागील धनदांडग्यांनी व आजी माजी पदाधीकारी यांनी केलेली अतिक्रमणे काढुन तेथे ऊभा करावा.







