जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांचे कडून गरजू मजूरांना धान्य वाटप
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि. १८
संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या व जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस भारतातुन हद्पार करण्यासाठी व फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने राज्यात लॉकडाऊन पुकारले आहे.अतिआवश्यक सेवा व जीवनाश्यक वस्तू,किराणदुकाने, भाजीपाला , दुध वगळण्यात आली आहेत.
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती घरातच साजरी करुन येथील जेष्ठ साहित्यिक तु . दा . गंगावणे यांनी जयंतीवर होणारा खर्च टाळून बिगारी कामगारांना गहू , तांदूळ , साखर असे जिवणावश्यक धान्य वाटप करून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरातच साजरी केली . हा स्तुत्य कार्यक्रम एका साहित्यिकांनी राबऊन जयंतीचा आनंद लुटला .कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉक डाऊन असल्याने ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा गरजु मजूरांना धान्य वाटप करण्यांत आले .या स्तुत्य कर्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






