Maharashtra

नंदुरबार शहरात रविवारी कडक संचारबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नंदुरबार शहरात रविवारी कडक संचारबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 12 : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 67 टक्के व्यक्ति नंदुरबार तालुक्यातील असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील आदेश येईपर्यंत नंदुरबार शहरात प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
सकाळी 9 वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना बाहेर पडण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. सर्व प्रकारची दुकाने, पेट्रोलपंप आदी आस्थापना व शासकीय कार्यालये या दिवशी बंद असल्याने रविवारी कोणीही बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडताना रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे.
संसर्ग रोखण्यासाठी विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रत्येक रविवारी सवयीचा भाग म्हणून या पद्धतीने संचारबंदीचे पालन करावे. या कालावधीत अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आदल्या दिवशी करावी व संचारबंदीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
0000

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button