Amalner

अमळनेर येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात कोरोना योद्धा म्हणून गौरव…

अमळनेर येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात कोरोना योद्धा म्हणून गौरव…

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात कोरोना योद्धा म्हणून अमळनेर येथे गौरव सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमळनेर येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात नुकताच राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली. मेळाव्यात कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि सुभराऊ फांऊंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धाचे सर्टिफिकेट आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.अंगणवाडी कर्मचाऱ्यानी शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा मिळविण्यासह अन्य प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी संघटनेची ताकद वाढवून संघटित लढा उभारणे गरजेचे आहे.असे मार्गदर्शन करताना मायाताई परमेश्वर सांगितले. कोरोनाच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना मुक्तिसाठी दिलेले योगदान प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात येत असल्याचे सुभराऊ फांऊंडेशन अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी बोलतांना सांगितले. संघटनेच्या आगामी आंदोलनाबाबत उपाध्यक्ष अँड.गजानन थळे(मुंबई), कार्याध्यक्ष युवराज बैसाणे (धुळे) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सुधीर परमेश्वर यांनी सुत्रसंचालन केले.मेळावा यशस्वी करण्यासाठी अमोल बैसाणे, संतोष पाटील, उदय पाटील, मिनाक्षी चौधरी, पुष्पा परदेशी, मंगला नेवे,आशा जाधव,सुनंदा नेरकर यांच्यासह आदिंनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button