Maharashtra

कोरोना योद्धा आरोग्य सेविका श्रीमती उज्वला कोळी ठोस प्रहार ने वेधले लक्ष

कोरोना योद्धा आरोग्य सेविका श्रीमती उज्वला कोळी
ठोस प्रहार ने वेधले लक्ष

अमळनेर-अमळनेर येथील नगर परिषद दवाखान्यात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका(ANM)असलेल्या उज्ज्वला कोळी ह्या समाजासाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत कोरोनाच्या काळात प्रतिबंधीत क्षेत्रातकार्य करत असताना आपलंसं करून सहज लोकांना उपचार करीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे

आपल्या दोन तरुण मुली गावावर एकट्या सोडून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या कोळी ताई कंत्राटी कर्मचारी असूनही कोणत्याही कामात कुचराई न करता अविरतपणे आपली सेवा देत आहेत शहरातील गल्ली,बोळ, वसाहत, व इतर ठिकाणी स्वतःप्रत्येक घरी जाऊन सर्व्हे व आरोग्य तपासणी करुन आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे अश्या ह्या कोरोना योध्याला लोकपत्रिका न्यूजचा मानाचा मुजरा….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button