Pandharpur

तिर्थक्षेत्र पंढरपुरात दीपावली मध्ये अन्न भेसळ प्रशासनाचे दुर्लक्ष रंगीत मिठाई ची राजरोस विक्री प्रशासनाची डोळेझाक

तिर्थक्षेत्र पंढरपुरात दीपावली मध्ये अन्न भेसळ प्रशासनाचे दुर्लक्ष

रंगीत मिठाई ची राजरोस विक्री प्रशासनाची डोळेझाक

प्रतिनिधी
रफिक आत्तार

तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये दीपावलीसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत असतात शहरात असलेले दीपावलीच्या फराळाचे स्टॉल, हॉटेल, स्वीट होम आदी ठिकाणी रंगीबेरंगी मिठाई तसेच विविध पदार्थ विक्री केली जाते परंतु अन्न व प्रशासन अधिकाऱ्याकडून कोणतेही पथक या ठिकाणी तपासणीसाठी आलेले दिसून येत नाही. दीपावली संपताच वेध लागतात ते कार्तिकी यात्रेचे मात्र ऐन सणासुदीत अन्न व भेसळ प्रशासनाने पाठ फिरवल्याने सर्वसामान्यांना भेसळीचे विविध रंगातील मिठाई व दिवाळीचे पदार्थ घ्यावे अन् खावे लागणार आहे परंतु अशा पदार्थातून मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याची चर्चा अनेक ठिकाणी ऐकावयास मिळत आहे. मंदिर परिसरामध्ये असलेले पेढा व बरफी विक्रेते त्याच बरोबर रस्त्यावर बसून भाविकांना कमी दरात विक्री होणारे पेढे दीपावलीच्या फराळाचे इतर साहित्य विक्री करताना वेगवेगळे आमिष दाखवले जात आहे. या आमिषाला गोरगरीब जनता मात्र भुलणार असल्याचे दिसत आहे. अनेक वेळा अन्न भेसळ प्रशासन अधिकाऱ्याकडून तपासणी करून कारवाई केली जाते मात्र आत्तापर्यंत ज्या ठिकाणी कारवाई झाली त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीचे आस्थापन सिल अथवा बंद केले नसल्याने कारवाई होऊनही त्याठिकाणी पुन्हा तेच भेसळीचे प्रकार का होत नसेल? असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. अन्न व भेसळ प्रशासन अशा प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष तर करत नाही ना? असेही नागरिक बोलताना दिसतात अन्न व भेसळ प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनतेला भेसळयुक्त पदार्थ विक्री केले जाणार नाही यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button