Dhule

धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई; गॅस सिलिंडर सह ३१ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई; गॅस सिलिंडर सह ३१ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

असद खाटीक

धुळे तालुक्यातील अजंग गाव शिवारात गॅस टँकर मधून अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस छोट्या टाक्यांमध्ये भरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी कारवाई मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत गॅस टँकर, घरघुती गॅसच्या टाक्या अन्य गॅस भरण्याचे यंत्र असे एकूण जवळपास ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अत्यंत असुरक्षित पद्धतीने १७ हजार किलोग्रॅम गॅस भरलेल्या टँकरमधून छोट्या गॅसच्या टाक्या भरल्या जात होत्या. सुदैवाने याठिकाणी कुठलंही विस्फोट झाला नाही. अशी मागणी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

चिन्मय पंडित (पोलीस अधीक्षक, धुळे)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button