Indapur

कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण इंदापुरात सापडणार नाही,नगरपालिकेचे धडाकेबाज नियोजन इंदापूर पॅटर्न चे सर्वत्र कौतुक – नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा.

कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण इंदापुरात सापडणार नाही,नगरपालिकेचे धडाकेबाज नियोजन इंदापूर पॅटर्न चे सर्वत्र कौतुक – नगराध्यक्षा सौ.
अंकिता मुकुंद शहा.

अमोल राजपूत

इंदापुर तालुक्यातील शेजारील बारामती तालुक्यात 7 कोरोना बाधित रुग्ण
आढळल्यामुळे भयभीत असताना देखील इंदापूर शहर व तालुका मात्र अद्याप कोरोना मुक्त आहे. त्याचे श्रेय सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,
तहसीलदार सोनाली मेटकरी, तसेच मा.ना.हर्षवर्धन पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शना नुसार पंचायत समितीचे सभापती पुष्पाताई रेडके, गटविकास अधिकारी
विजयकुमार परीट,इंदापुर नगरपालिकेच्या धडाकेबाज नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा,
मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, तालुका वैद्यकीयवअधिकारी डॉ. सुरेखा पोळ, उपजिल्हारुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मोरे,पोलीसनिरीक्षक
नारायण सारंगकर, सहायक पोलीसनिरीक्षक दिलीप पवार व जीवन माने,
सार्वजनिकबांधकामविभागाचे तालुका अभियंता धनंजय वैद्य, वीज मंडळाचे तालुका
अभियंता रघुनाथ गोफणे व सहकारी यांचे नियोजन ,
त्यास नागरिकांनी दिलेली साथ याला जाते.

पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी, मोरगाव ही तीर्थक्षेत्र तर पुणे व
सोलापूर ही व्यापारी ठिकाणे आहेत. मुंबई ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग इंदापूरातून जातअसल्यानेबकोरोना ची भीती होती. मात्र राज्यमंत्री भरणे यांनी
सातत्याने पुढाकार घेऊन आढावा बैठकीच्या माध्यमातून सर्व अधिकार्यांशी सुसंवाद ठेवत आताबपर्यंत कोरोना स दूर ठेवण्यात यश मिळवले आहे.

तालुक्यातील गावे निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटाइझर व साबणाचा वापर करणे, मास्क वापरणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना तालुक्यातील 115 ग्राम
पंचायतीने राबविल्या तर शहरात मा. ना.हर्षवर्धन पाटील यांच्या सुचने नुसार नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, इंदापूर तालुका
शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी प्रत्येक नगरसेवकाच्या माध्यमातून शहरात धुरळणी, फवारणी असे उपक्रमराबविले.शहरातील भाजीपाला,किराणा माल, पेट्रोल पंप, गॅस याचे योग्य नियोजन केले. नगरपरिषद व पोलीस कर्म- चार्यांनी एकत्रित शहरात नवीन कोणी येऊ नये यासाठी सुरू केलेल्या
पाच तपासणी नाक्याचा फायदा शहरास झाला.जेवढे बाहेरचे कामगार आले, त्यांचे नियोजन शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले देशपातळीवरस्वच्छताअभियानात नगरपरिषदेने पहिल्या दहा मध्ये क्रमांकपटकावल्याने त्या नियोजनाचा फायदा इंदापूर नगरपरिषदेस झाला.
त्यामुळे कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी इंदापूर नगरपरिषद पॅटर्न चे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button