Baramati

मौजे झारगडवाडी येथील आदीवासी पारधी समाज्यातील लोकांचे घरे जमीनदोस्त,आदिवासी पारधी संघटना आक्रमक

मौजे झारगडवाडी येथील आदीवासी पारधी समाज्यातील लोकांचे घरे जमीनदोस्त,आदिवासी पारधी संघटना आक्रमक

बारामती – ग्रामीण भागातील
निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण (2018-2019)राज्यशासन राबवत असताना मौजे झारगडवाडी ता.बारामती जि. पुणे येथील पारधी वस्तीवरील पक्के व कच्चे घर जमिनदोस्त करणाऱ्या कर्मचारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,अन्यथा आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेमार्फत 4 नोव्हेंबर 2021 रोजी मा. खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या निवासस्थानी (गोविंदबाग,माळेगाव)आंदोलन करण्यात येणार असल्याचे माहिती राज्यसमन्वयक श्री.आनंद काळे व बापूराव काळे यांनी राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनात दिली आहे.

केंद्रशासन व राज्यशासन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना सन 2022 पर्यंत सर्वाना घरकूल तसेच सर्वाना निवारा देण्याचे जाहीर करते.व एकीकडे आदिवासी जमाती,दुर्बल घटकातील लोकांची घरे जमीनदोस्त करतात.अशा हुकूमशाही शासनाचा जाहीर निषेध केला पाहिजे.
बारामती तालुक्यामध्ये घराविना अनेक पारधी कुटूंब फूटपाथवर वास्तव्य करून उदरनिर्वाह करीत आहे.त्यांना शासनाच्या कोणत्याही सुखसुविधा आजपर्यंत भेटलेल्या नाहीत.कधीही आमदार,खासदार निधींयोजनेतून पारधी समाज्यासाठी एकही रुपया मंजूर अथवा खर्च केलेला नाही.बारामती तालुक्यातील इतर गावामध्ये अतिक्रमण नियमित झालेली असताना मौजे झारगडवाडी येथील पारधी समाज्यातील घरावरील अतिक्रमणावर हातोडा मारण्याचे काम तेथील कर्मचारी व पदाधिकारी यांनी केलेला आहे.त्या लोकांवर तात्काळ कारवाई करून पारधी समाज्यातील लोकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे,अन्यथा आम्ही 4 नोव्हेंबर रोजी मा. खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या निवासस्थानी अन्यायग्रस्त पारधी कुटूंब व आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे पदाधिकारी उपोषणाला बसणार आहोत असा गंभीर इशारा पाठवलेल्या निवेदनात दिलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button