फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये ख्रिसमस डे मोठ्या उत्साहात संपन्न
प्रतिनिधी
रफिक आतार
सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ‘मेरी ख्रिसमस’ हा सण उत्साहामध्ये संपन्न झाला. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. ख्रिस्तजयंती प्रेम, उमेद, आशा यांचा उत्सव असतो. शाळेमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मा. भाऊसाहेब रुपनर व सौ. सुरेखा रुपनर, तसेच संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, शाळेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ख्रिसमस सेलिब्रेशनची स्वतःहून तयारी केली. रंगीबिरंगी लाल रंगाचे कपडे परिधान करून अनेक विद्यार्थी नाताळ सांताक्लॉजचा वेश परिधान करून आली होती. हाऊस डेकोरेशनसाठी ब्लू हाऊस, यलो हाऊस, ग्रींन हाऊस आणि रेड हाऊस चे बोर्ड विविध प्रकारच्या फुगे ,ग्रीटिंग कार्ड , ख्रिसमस ट्री ,फ्लावर्स, इत्यादी लावून हाऊस मास्टर च्या मदतीने हे सर्व हाऊस विद्यार्थ्यांनी सजवले. सकाळपासूनच सर्व शाळा उत्साहाच्या वातावरणात गजबजून गेली होती. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे शिक्षक श्री. अजिंक्य गुरव यांनी केलेल्या प्रास्तविकाने झाली. ख्रिसमस डे बद्दल माहिती सांगून प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माची ही कथा सांगितली. सांताक्लॉज हा एक कल्पवृक्षाप्रमाणे काम करतो हेही सांगितले. त्यानंतर इयत्ता सहावी मधील कुमार अजय पवार याने ख्रिसमस सेलिब्रेशन बद्दल माहिती सांगितली .प्रमुख पाहुणे व चिमुकल्या सांन्ताक्लॉज सोबत नाताळ केक कापला. इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी सुप्रिया पवार आणि कुमारी प्राप्ती अलदर यांनी केले. तसेच इयत्ता आठवी मधील कुमार प्रज्वल लिगाडे याने आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व श्री सिकंदर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






