तिळगुळाच्या गोडव्यात तपसे चिंचोली येथे मकर संक्रांत साजरी
औसा:- प्रशांत नेटके
तालुक्यातील तपसे चिंचोली येथे तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा स्नेहमय संदेश देत एकमेकांना तिळगुळाचे वाटप करीत पारंपरिक पद्धतीने मकरसंक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली.
बुधवारी सकाळपासूनच प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची लगबग पाहायला मिळाली.
लहानांनी थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेत व एकमेकांना तिळगुळ देत आनंद लुटला.
नागरिकांनी युवक युवतींनी एकमेकांना एसएमएस द्वारे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
शिवाय व्हाट्सएप ,फेसबुक, ट्विटर अशा सोशल मिडीयाद्वारे एकमेकांना संदेशाची देवाणघेवाण झाली.
महिलांनी या दिवशी पारंपरिक पद्धतीने विषेश पोशाख परिधान केला होता.
तपसे चिंचोली गावातील खंडोबा मंदिर, मारुती मंदिर, दत्त मंदिर, महादेव मंदिर अशा विविध मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त गर्दी केली होती.
पूजेनंतर एकमेकींना वान दिले .
गावांतील महिलांनी ग्रामदैवताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी महिलांनी ग्रामदेवताच्या मंदीरात दर्शन घेऊन एकमेकांबद्दल स्नेहसंबंध व्यक्त करणारा ओवसण्याचा धार्मिक कार्यक्रम केला.
यावेळी गावातील संपताबाई नेटके,साधना गरड,कुसुम शिंदे,स्वाती नेटके,कोंडाबाई कांबळे,कालिंदाबाई, नेटके ,शोभा काकडे, अरुणाबाई मोरे,नंदाबाई बोबडे, विमल नेटके,सिंधूबाई गरड,चंद्रकला नेटके,अनिता कोरे ,लोचना गरड,जिजाबाई गायकवाड, आशा गरड, , मीरा सूर्यवंशी,अनिता कोरे,अशा अनेक महिला उपस्थित होत्या.






