शाळेत रंगला कलामहोत्सव– विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा पांढरपौणी शाळेत आविष्कार
चिमूर -ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर पं स अंतर्गत जि.प.प्रा.शाळा पांढरपौणी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उभारी मिळावी,त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा याकरिता या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पं.स.सदस्य अजहर शेख यांनी केले.अध्यक्षस्थानी खडसंगी ग्रामपंचायत सरपंच यशोदा तराळे होत्या.प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच प्रमोद श्रीरामे,ओंकार चिंचाळकर,पोलिस पाटील प्रफुल रामटेके,तंटामुक्त समिती अध्यक्ष नाना मेश्राम,दीपक पाटील,प्राचार्य मेश्राम आदी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्ताने नृत्य,गायन,नक्कल या विविध कलागुणांचा आविष्कार सादर केला.अवघी चार विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळा पालक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना उंच भरारी देऊ शकते हे येथील शिक्षकांनी दाखवून दिले आहे.हे शिक्षक कौतूकास पात्र आहेत असे प्रतिपादन पं.स.सदस्य अजहर शेख यांनी केले.वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने गावातील महिलांचे हळदीकुंकू घेण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन स.शि.पांडुरंग भोरे यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय कापगते यांनी केले.कार्यक्रमाला खडसंगी केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती,महिला मंडळ,युवक मंडळ,पालकांनी स्नेहसंमेलनाला विशेष मदत केली.






