Paranda

गॅस आणि दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्याने चहाचा घोट महागला.

गॅस आणि दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्याने चहाचा घोट महागला.

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि २६

मागील पाच ते सहा वर्षांत चहाचे दर वाढले नसले तरी यंदा
गॅस सिलिंडरपाठोपाठ दुधाच्या भाववाढीमुळे चहावाल्यांनीसुद्धा भाववाढ केल्याने एक चहामागे दोन रूपयांची वाढ केली आहे. मागील सहा वर्षांतील ही पहिलीच वाढ चहावाल्यांकडून केली आहे. वेगवेगळ्या नावाने ब्रॅण्डिंग सुरू केलेल्या देवकर चहा ,अमृततुल्य’ चहाच्या दुकांनावर एका चहासाठी दहा रुपये लागतात .
देश आर्थिकमंदीतही असताना चहाचे मार्केट मात्र गरमच दिसत आहे.

गॅस आणि दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्याने चहाचा घोट महागला.चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. प्रत्येक नाक्यानाक्यावर चौकात चहाच्या टपऱ्या दिसतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच चहाची गोडी आहे. त्यामुळे या व्यवसायात नकळत कोट्यवधींची उलाढाल होते. देशात आर्थिकमंदी असो वा महागाई, चहाच्या व्यवसायावर फारसा परिणाम जाणवत नाही. चहा महागला तरी चहाचे चाहते कमी झालेले नाहीत. कडक उन्हाळा , पावसाळा असो की हिवाळा, लोकांना चहा हवाच असतो. म्हणूनच रस्त्याच्या कडेला दिवसेंदिवस चहा टपप्या हॉटेल फुलतच आहे. सध्या या व्यवसायाला गॅस आणि दुधाच्या भावाढीचे ग्रहण लागले आहे. मागील वर्ष भरात गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. पूर्वी जे गॅस सिलिंडर १२९६ रुपयांना मिळत होते, ते आता १५२३ रुपयांना मिळत आहे. तसेच दूध सहा महिन्यांपूर्वी ३४ रुपये लिटरने मिळत होते, ते आता ४४ रुपये लिटरने मिळत आहे. दूध आणि गॅसचा भाव पाच ते सहा वर्षांत अनेकदा वाढला. परंतु चहाच्या भाव वाढला नव्हता. आता मात्र भाववाढ करणे जोखमीचे झाल्याचे कारण पुढे करत विक्रेत्यांनी २ रुपयाची वाढ केली आहे. भाव वाढले तरी ग्राहक कमी झाले नसल्याचे चहाविक्रेतानी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

गॅस आणि दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्याने चहाचा घोट महागला.

( गेल्या वर्षा पासून गॅस सिलिंडरचे भाव सतत वाढत आहेत. तरीही चहाच्या भावात वाढ झालेली नव्हती. मात्र आता गॅस आणि दुधाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाल्याने चहाच्या किमतीत वाढ करावी लागली. १ जानेवारीपासून भाववाढ झाली आहे
-रामलींग गायकवाड चहा विक्रेता
शिवनेरी हॉटेल परंडा )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button