Maharashtra

दररोज एक तास स्वतःसाठी काढणे आवश्यक-डॉ चौधरी. निंभोरा येथे योगदिनानिमित्त केली प्रात्यक्षिके सादर

दररोज एक तास स्वतःसाठी काढणे आवश्यक-डॉ चौधरी.
निंभोरा येथे योगदिनानिमित्त केली प्रात्यक्षिके सादर.

प्रतिनिधी संदीप कोळी

प्रपंचातील इतर कामे आवश्यक असली तरी दररोज किमान एक तास प्रत्येकाने योगासने व प्राणायाम करावा असे आवाहन जागतिक योग दिनानिमित्त आयोजित प्रात्यक्षिक शिबिरात डॉ एस डी चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
येथील कृषी तंत्र विद्यालयात अंबिका योग कुटीर, ठाणे यांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून नियमित योगवर्ग घेतला जातो .२१ जून या जागतिक योगदिनानिमित्त कोरोनाच्या काळातही योग्य अंतर राखून व सॅनिटायझर व मास्कचा सर्वांनी वापर करत योग्य प्रात्यक्षिके केली.यावेळी डॉ चौधरी यांच्यासमवेत योगगुरू विष्णू दोडके यांनी ही तरुणांकडून प्रात्यक्षिके करून घेतली.शेख दिलशाद सर यांनी योगाचे महत्व सांगत आरोग्यमंत्राचे महत्व सांगितले.या योगवर्गास ऋषी विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे,प्राचार्य एम टी बोंडे,उनिल कोंडे,शिक्षक भावसार,बाविस्कर,विवेक बोंडे,दिलशाद शेख,मिलन कोंडे,धीरज भंगाळे,संदीप महाले,दीपक सोनवणे,प्रभाकर राणे,आदी तरुण उपस्थित होते.
—–
कोटोणासाठी कपालभाती महत्वाची-
कोरोनासारख्या गंभीर व्हायरल आजारात शरीरात ऑक्सीजन वाढण्यासाठी व आत्मबल वाढण्यासाठी कपालभाती महत्वाची असल्याचे विष्णू दोडके यांनी सांगितले.प्रत्येक योगासनात आत्मबल वाढविण्याची शक्ती असून निरोगी राहण्याससाठी प्रत्येकाने योगा करण्याबाबतचे आवाहन यावेळी संस्थेतर्फे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button