कोळी समाजाने दि.९ अॉगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा करावा..
तालुकासंपर्कप्रमुख..जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन.
चोपडा (प्रतिनिधी..
रामायणकार,आद्यकवी, गुरूदेव म.वाल्मिकी रूषी यांचा वंशज असलेल्या कोळी समाजाने आपण आदिवासी असल्याचा अभिमान बाळगावा.कायद्याचा आदर करून स्वाभिमानाने आपापसातील वादविवाद,भांडणतंटे,संघर्ष मिटवुन इतर समाजाशी सुध्दा सलोख्याचे संबंध ठेवावेत.कोरोनाच्या महामारी पासुन घरपरिवार,गांव व समाजाचे संरक्षण करावे.गांवातील कोरोना योध्द्यांना सर्वतोपरी मदत करून स्वत् ही काळजी घ्यावी.अशी विनंती करण्यात येत आहे.
शासनाच्या आदिवासी विभागातर्फे “दि.९ ऑगस्ट हा दिवस आादिवासी दिन” म्हणुन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो.तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघात आदिवासींमध्ये कोळी समाजाची सर्वात जास्त लोकसंख्या असल्याने हा मतदारसंघ अनु.जमातीसाठी राखीव अाहे. तालुक्यात ज्या गावांमध्ये आदिवासी कोळी समाज आहे,त्याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून मिरवणुक न काढता “दि.९ ऑगस्ट २०२०,वार रविवार रोजी स.९ वा.”आपापल्या गांवातील,चौकातील,प्रत्येक घराघरांतील म.वाल्मिकी रूषींची मुर्ती,प्रतिमा,फलक यांचे विधीवत पुजन व नमस्कार करून “आदिवासी दिन” मोठ्या आनंदाने साजरा करावा.असे आवाहन चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ टि.बाविस्कर (गोरगांवले बु.)यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.






