Maharashtra

पाटणा देवी ता.चाळीसगाव मंदिराची कथा व व्यथा

पाटणा देवी ता.चाळीसगाव मंदिराची कथा व व्यथा 

पाटणा देवी ता.चाळीसगाव मंदिराची कथा व व्यथा

चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
 महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाटणादेवी मंदिरात ही दानपेटी कधीपासून व कुणाच्या परवानगीने ठेवण्यात आली . यात आलेल्या दानाचा मालक कोण ? व या दानातील रोख रक्कम , सोन , चांदी याचा मालक कोण ? आजपावेतो भाविकांकडून या दानपेटीत टाकलेल्या लाखो / करोडो रूं. दानाचा खर्च कोणी व कुठे केला ?
● हे मंदिर भारतीय पूरातत्व खात्याच्या देखरेखी  व अधिकारपत्याखाली येत असल्याने केंद्रसारकर येथील मूलभूत  सुविधा , सुधार , सुशोभीकरणासाठी दरवर्षी लाखो रुपये निधी खर्च करते . कारण पाटणा देवी मंदिर हे तृतीय दर्जाचे एक राष्ट्रीय स्मारक आहे याची काळजी व देखभालिसाठीचा सर्व खर्च हा  शासनस्तरावरून केला जातो . असे असतांना या या मंदिरात  ही दानपेटी का व कशासाठी ठेवण्यात आली ? ही दानपेटी येथे ठेवण्यामागील उद्देश्य व हेतू काय ?
●  या मंदिराला वेळोवेळी भेट देणाऱ्या भारतीय पुरातत्व खात्याने , अधिकाऱयांनी  त्यांच्या मालकीच्या मंदिरात एवढी भलीमोठी दानपेटी कोणी व का ? ठेवली याचा उलगडा व उहापोह  का केला नाही ? ही बेकायदा ठेवण्यात आलेली दानपेटी का ताब्यात घेतली नाही ? अथवा ठेवणार्यावर फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही ? कारण या खात्याच्या नियमानुसार मंदिरापासून 300 मीटर जागेत काहीही करता येत नाही व करावयाचे असल्यास त्याची या खात्याकडून ना हरकत तसेच परवानगी घेणे बंधनकारक आहे .असे न केल्यास संबंधितावर कायदेशीर कार्यवाही केली जाते . 
             या खात्याच्या परवानगी शिवाय या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले हे पुजारी कोण ? ही दानपेटी कुणाच्या परवानगीने ठेवण्यात आली ? या ठेवलेल्या  दानपेटी बाबत भारतीय पुरातत्व खात्याच्या दप्तरी नोंद आहे का ? ही बेदखल आहे ? 
●  या मंदिरात व या मंदिराच्या ओट्यावर बसून पाटणा निवासिनी चण्डिकादेवी प्रतिष्ठाण , पाटणा ता. चाळीसगाव  च्या नावे व इतरही वेगवेगळ्या नावाने येथे पावत्या फाडण्यात आल्या व आजही दिवसाढवळ्या भाविकांकडून फाडल्या जात आहेत . यांच्यावर भारतीय पुरातत्व खात्याकडून त्यांच्या मालकीह्ददीत सुरू असलेल्या आर्थीक फसवणूक व अपहाराची नोंद घेऊन  येथे येणाऱ्या भाविकांची मंदिरातील देवीच्या नावाने फसवणूक दिशाभूल व आर्थीक पिळवणूक करणाऱ्यावर आजपावेतो फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करून यांच्यावर न्यायालयात खटला का चालविण्यात आला नाही ? अशी कार्यवाही आजपर्यत न झाल्याने येथील व महाराष्ट्रभरातील सुज्ञ व जागरूक नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे तसेच भारतीय पुरातत्त्व विभाग औरंगाबाद व उप मंडल धुळे व भारतीय पुरातन सर्वेक्षण , पितळखोरा गुफाए , पितळखोरा येथील तत्कालीन व विद्यमान अधिकारी व कर्मचाऱ्याकडून येथे दानपेटी ठेवणाऱ्यावर , येथे विनापरवानगी बोअरींग करणाऱ्यावर , या मंदिरातील पुरातन श्री विष्णू , श्रीलक्ष्मी मुर्तीनां कृत्रिम रंग देणाऱ्यावर  आजपावेतो कायद्यानुसार कार्यवाही का करण्यात आली नाही ? असे भाविकांकडून केले जाणारे प्रश्न आजही अनुत्तरित का ? यामागिल कारणे काय ? हा संशोधनाचा विषय आहे.
    
                               
                           

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button