Kolhapur

राज्यातील कलावंतानां राज्यशासनाने आर्थीक मदत करावी.

राज्यातील कलावंतानां राज्यशासनाने आर्थीक मदत करावी.

एन एस पी चे यूवक प्रदेश उपाध्यक्ष सूशांतभाऊ गोरवे यांची मूख्यमंत्र्यांकङे मागणी

कोल्हापूरःआनिल पाटील

राज्यातील वाद्यवूंद कलावंतावर कोरोणामूळे आर्थीक संकट व उपासमारीची वेळ आली असून राज्यशासनाने त्यानां आर्थीक मदत करावी . अशी मागणी नॅशनल सोशालिस्ट पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सूशांतभाऊ गोरवे यांनी मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकङे एका निवेदनाद्भारे केली आहे.

निवेदनातील आशय असाः

करोनाच्या संकटामुळे देशभर असलेल्या लाँकडाऊनचा फटका बसला आहे, संपूर्ण देश बंद असल्याने व्यवहार व्यवसाय वेगवेगळे समारंभ,कार्यक्रम,घेण्यास,बंदी असल्याने यावर उदरनिर्वाह करणार्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे,दरवर्षी या दिवसात लग्नसराई ,घरगुती कार्यक्रम, मिरवणूका असते,अशा कार्यक्रमात संगीतमय पारंपरिक वाद्य सनई, सूर,हालगी,बँन्ड,बँन्जो पथकात काम करणार्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे,
यात्रा, जयंती, मिरवणुका तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रमाची सुपारी घेऊन आपला उदरनिर्वाह करत असतात, आपल्या कुटूंबाला जिवंत बघण्यासाठी शासनाने कठोर पाऊल घेऊन येतील कलाकारांना मदत मिळवून द्यावी..असे ही या निवेदनात म्हणटले आहे.

निवेदनावर

मा.मनोज काळसेकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष_
.तुकारामभैय्या खांडेकर युवक महाराष्ट्रप्रदेशाध्यक्ष_

पियुष पाटील युवक जिल्हाध्यक्ष_

_मा.नसीब झाडे महाराष्ट्र मिडिया प्रमुख व विदर्भ प्रमुख_यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

संबंधित लेख

One Comment

Leave a Reply

Back to top button