Amalner

?️अमळनेर कट्टा…सावधान..!कोणतीही लिंक ओपन करत आहात..?काळजी घ्या..!बँकेतून होतील पैसे कट..

?️अमळनेर कट्टा…सावधान..!कोणतीही लिंक ओपन करत आहात..?काळजी घ्या..!बँकेतून होतील पैसे कट..!

अमळनेर येथील गांधलीपुरा भागातील व्यक्तीस भ्रमणध्वनी वरून msg व फोन करून फसविल्याची घटना घडली आहे.या बाबतीत सविस्तर माहिती अशी की दोन मोबाईलवरून संपर्क करून फोन पे वरून 4 हजार 999रूपये पाठवतो तू लिंक ओपन कर असे सांगून तब्बल 19 हजार 996 रु ला गंडा घातला आहे.गांधलीपुरा भागातील रहिवासी संजीव मोरे यांनी टाकलेली लिंक ओपन करताच 20 हजार रु त्यांच्या बँक खात्यातुन कट झाले आहेत.ही घटना ३ जून रोजी घडली असून संजीव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button