गोल्डन अपाॅरच्युनिटीज आयोजित आॅनलाईन राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा निकाल जाहीरप्रतिनिधी रफीक आत्तारगोल्डन अपाॅरच्युनिटी तसेच श्री नरेंद्र लक्ष्मण लोहार (समाज सेवक) यांच्या वाढदिवसानिमित्त सौ.यामिनी लोहार यांनी ऑनलाइन राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 95 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे परीक्षण सौ. भावना शिवाजी विभूते, सांगली (शिक्षिका) यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुदाम लगड, फिरोज शेख, हेमराज यमाजी वाघ, लोमेश वनराज लोहार, जितेंद्र लुळे, ईश्वर महाजन, पंकज नाले,सचिन तोरणेकर, पार्थ भेंडेकर यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी वनराज लिलाधर लोहार, लक्ष्मण चांगो लोहार, मनोज चव्हाण, मनोज भावलाल लोहार, राकेश लोहार आणि संपूर्ण मित्र परिवाराकडून शुभेच्छा मिळाल्या.या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नांदेड, पुणे, अमरावती, सांगली, चंद्रपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, औरंगाबाद, सुरत, रायपूर, सोलापूर, बीड येथून स्पर्धक सहभागी होते. यामध्ये पुनीत मारुती काळसेन सांगली प्रथम, अंकुश नथुराम जाधव रायगड द्वितीय आणि निलेश बाळासाहेब पाऱ्हाटे पुणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर स्मिता प्रशांत देशमुख अमरावती, स्वप्निता कमलाकर आंबेरकर रत्नागिरी, राजेंद्र शाहूराव लाड बीड, कवी एम. अमोल चंद्रपूर, अॅड.हिमांशू अनिल पाटील पालघर, काव्यरजनी विजय ठोंबरे मुंबई, सौ. स्वेजल संदेश म्हात्रे पालघर, कु. शुभांगी दिगंबरराव देशमुख बीड, रुकसाना कलंदर मुल्ला यमगर्णी, जयश्री सतीश काळे-सातारा, डॉ. अविनाश सरगर सांगली यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले.सर्वांना डिजिटल सन्मानपत्र देण्यात आले. तसेच सर्व विजेत्यांचे ऑनलाइन लाईव्ह सत्र घेण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच नरेंद्र लोहार ,यामिनी लोहार तसेच गोल्डन अपाॅरच्युनिटीजच्या टिम ने सर्व कवींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






