परंडा तालुक्यातील दुकाने खुली ठेवण्याची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत वाढवुन द्यावी
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे फारुक शेख यांची मागणी
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
परंडा तालुक्यातील लहाण मोठे व्यापाऱ्यांना आपली दुकाने खुली ठेवण्यासाठी वेळ वाढवुन द्यावी आशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे मराठवाडा सचिव फारूक शेख यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीत म्हटले आहे की कोविड १९ च्या आजारामुळे बदलुन गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी परंडा तालुक्यातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने खुली ठेवण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अशी वेळ दिली होती सध्या सणासुदीचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील लोकांना येण्यासाठी सुविधा नाहीत त्यामुळे परंडयात खरेदिस येण्यास वेळ लागतो वेळ कमी असल्याने बाजारात गर्दि होते . जर वेळ भरपुर असल्यास बाजारात गर्दि होणार नाही . लोकांची गैरसोय दुर होईल .
तालुक्यातील व्यापाऱ्यानी कोविडची १९ ची टेस्ट केली आहेत त्यामुळे नुतन जिल्हाधिकाऱ्यांनी परंडा तालुक्यातील व्यापाऱ्यांना दुकाने खुली ठेवण्याची वेळ वाढवुन द्यावी शेजारच्या सोलापुर जिल्हयात धाराशिव जिल्ह्यातील इतर तालुक्यात दुकाने खुली ठेवण्याची वेळ परंडा तालुक्यापेक्षा जास्त आहे मग परंडा तालुक्यावरच अन्याय का ? असा सवाल व्यापारी विचारीत आहेत . गर्दि टाळण्यासाठी दुकांनाची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत वाढवुन द्यावी त्यामुळे कोरोनाचा प्रादुभाव रोखण्यास मदत होईल आणि व्यापारीही शासणाच्या नियमांचे पालन करीत दुकाने खुली ठेवतील वेळ वाढवुन मिळाल्यास नागरीकांची सामान खरेदिसाठी गर्दि होणार नाही . या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घावी अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे मराठवाडा सचिव फारूक शेख यानी केली आहे . याच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , प्रधान सचिव , विभागीय आयुक्त याना पाठवल्या आहेत.






