अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा पंधरवडा होणार साजरा
वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम होणार आयोजित
शब्बीर खान
यावल- (प्रतिनिधी)नुकतीच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची राष्ट्रीय कार्यकारणी व राज्य कार्यकारणीची बैठक ऑनलाईन पार पडली. यामध्ये सालाबादाप्रमाणे १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंतचा पंधरवडा हा वृक्षारोपणासह रोगनिदान शिबिरे, रक्तदान शिबिरे आदी अनेक उपक्रम राबवून साजरा होणार आहे. याविषयी सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.
स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने यांच्या ३ ऑगस्ट रोजी व केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांच्या १४ ऑगस्ट रोजी च्या वाढदिवसाच्या औचित्य साधून १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. यात वृक्षारोपण, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, पेपर वाटणाऱ्या मुलांना छत्री, रेनकोट, पेपर थैली वाटप, रक्तदान शिबीर, रोगनिदान शिबिर आदी विषयांवर समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी या कालावधीत शक्य तितके समाजपयोगी कार्यक्रम अ. भा. ग्रा. पत्रकार संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी, सदस्यांनी सगळीकडे राबवावे असे आवाहन अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, महासचिव सुरेश सवळे, सचिव अशोक पवार, कोषाध्यक्ष अशोक याऊल, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, सरचिटणीस प्रा. रविंद्र मेंढे, प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगीवकर आदींनी केल्याची माहिती राज्य प्रसिध्दी प्रमुख शहजाद खान यांनी कळविली आहे.






