जि प शाळा चुंचाळेच्या जीर्ण खोल्या निर्लेखनाची लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडली
शब्बीर खान
वार्ताहर(चुंचाळे):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंचाळे च्या जीर्ण व धोकादायक इमारतीच्या निर्लेखनाची लिलाव प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या निर्देशनानुसार आज दि 10 सप्टेंबर रोजी पार पडली.शाळा व्यवस्थापन समितीच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयाने निर्लेखनाची मंजुरी दिली.याकामी शिक्षण सभापती जि प जळगाव मा श्री रवींद्र पाटील यांनी वेळोवेळी योग्य ती मदत केली.लिलाव प्रक्रिया पार पडतांना सोशल डिस्टनसिंग पळून शासनाने विहित केलेल्या नियमांप्रमाणे अतिशय पारदर्शक पणे जाहीर लिलाव पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली .या वेळी परिसरातील नागरिक लिलावसाठी उपस्थित होते.प्रक्रिया पार पाडणेकामी शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, किनगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रमोद सोनार यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी चुंचाळे पोलीस पाटील गणेश पाटील,बोराळे उपसरपंच उज्जैनसिंग राजपूत,सामाजिक कार्यकर्ते व सरपंचपती संजय पाटील,आदी उपस्थित होते






