निर्भयाला न्याय मिळाला आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळावा.असे मत शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महिला आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्षा स्वप्नाली अनिल साठे
प्रतिनिधी रफिक आतार
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेली निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला आहे. चौघा आरोपींना आज तिहार जेलमध्ये एकाच वेळी फाशी देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळवा, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केली आहे.देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी ही घटना आहे. निर्भयाला न्याय मिळाला, आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची. कोपर्डीचे बलात्कारी नराधम सुद्धा लवकरात लवकर फासावर लटकले पाहिजेत. त्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं शिवबुध्दच्या स्वप्नाली साठे यांनी म्हटलं आहे. गुन्हेगारांना आमच्या माता भगिनीवर वाईट नजरेने बघण्याचे धाडस सुध्दा झाले नाही पाहिजे असं म्हणत शिवबुध्दच्या स्वप्नाली साठे मा.राष्ट्रपती आणि मा. सर्वोच्च न्यायालययाचे सर्व देशवासियांच्या आणि महाराष्ट्रातच्या वतीने आभार मानले आहेत.
दरम्यान निर्भयाला न्याय मिळाला याचं मला समाधान आहे. इतकंच नाहीतर निर्भयाची आई ही म्हणाली की न्याय मिळाला असे अभिमानास्पद
असल्याचं निर्भायाच्या आईने म्हटलं आहे.असे मत शिवबुध्दच्या महिला आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्षा स्वप्नाली अनिल साठे यांनी व्यक्त केली.






