फैजपूर

फैजपूर पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्ष पदी रशीद तडवी

फैजपूर पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्ष पदी रशीद तडवी

सलीम पिंजारी

फैज़पुर — फैजपूरच्या नगराध्यक्षा सौ महानंदा रवींद्र होले ह्या दि १९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत रजेवर गेल्याने उपनगराध्यक्ष रशीद नसीर तडवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे.
फैजपूर पालिकेच्या नगराध्यक्षा सौ महानंदा होले यांनी दि १ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत रजा काढल्याचे लेखी पत्र त्यांनी मुख्याधिकारी यांना दि ३१ ऑक्टोबर रोजी दिले आहे या कालावधीची रजा घेतल्याने रजा कार्यकाळातील त्यांच्या पदाचा पदभार उपनगराध्यक्ष रशीद तडवी यांच्या कडे देण्याचे रजा काढलेल्या पत्रात नमूद केले आहे उपनगराध्यक्ष रशीद तडवी यांनी आज दि १ नोव्हेंबर रोजी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला असून नगराध्यक्षा सौ महानंदा होले यांच्या रजा काळातील फैजपूर पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष पद भार स्वीकारला आहे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button