Paranda

रा गे शिंदे महाविद्यालयात डॉ व्ही एम गुरमे यांचे मार्गदर्शन

रा गे शिंदे महाविद्यालयात डॉ व्ही एम गुरमे यांचे मार्गदर्शन

सुरेश बागडे

परांडा ( सा.वा ) दि. ०५

शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये नॅक डी व्ही व्ही आणि पियर टीम व्हिजिट या विषयावरती एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील आयक्यू एसीचे सदस्य डॉ ०ही एम गूरमे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते तर व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे आणि आय क्यू ए सी चे समन्वयक प्रा दीपक तोडकरी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागातील वरिष्ठ प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्या डॉ दीपा सावळे डॉ ०ही एम गुरमे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयक्यू एसीचे समन्वयक प्रा दीपक तोडकर यांनी केले यावेळी डॉ ०ही एम गूरमे यांनी नैक संदर्भात आपले व्याख्यान दिले ते आपल्या व्याख्यानांमध्ये म्हणाले की नॅक समिती आल्यानंतर महाविद्यालयाने एकूण सात क्रायटेरिया चे सविस्तर वाचन करून प्रत्येक समन्वयाने आपापला क्रायटेरिया व्यवस्थितपणे समोर मांडावा महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचा वृत्तांत स्पष्टपणे त्यांच्यासमोर ठेवावा महाविद्यालयात आयोजित केलेल्या आयसीटी लेक्चर्स , सर्व डॉक्युमेंटेशन सर्वांचे अनुभव प्रमाणपत्र सर्व सांस्कृतिक विभागाचे कार्यक्रम त्या कार्यक्रमाचे अहवाल विद्यार्थी आणि त्यांनी केलेल्या विविध कार्यक्रमाच्या सविस्तर ऍक्टिव्हिटीज त्यांच्यासमोर मांडाव्यात एकंदरीत महाविद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या सर्व विभागाच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर ठेवण्यात यावा सर्वांनी अगदी निसंकोचपणे नॅकला सामोरे जावे . आपण केलेल्या प्रमाणिक कामाची कार्यपद्धती समोर दाखवल्यास यश हमखास येते यावेळी डॉ गुरमे यांनी महाविद्यालयातील सर्व विभागाची तपासणी केली समोर ठेवण्यात येणाऱ्या क्रायटेरिया चे वाचन करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ दीपा सावळे म्हणाले की महाविद्यालयांमध्ये नॅकचे स्वागत करण्यासाठी , नॅकला सामोरे जाण्यासाठी आमचे महाविद्यालय कटिबद्ध आहे महाविद्यालयात होणाऱ्या एकूण विविध कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव संजय निंबाळकर साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेले आहे त्यामुळे या महाविद्यालयाची सर्व टीम अगदी प्रामाणिकपणे काम करत आहे यावेळी या कार्यशाळेचे आभार नैक समन्वयक प्रा विद्यार्थी नलवडे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button