Paranda

लॉक डाऊनमुळे सोनारी कौडगाव येथे पालीवर अडकलेल्या कुंटुबियांना महसुल प्रशासणाने किराणा मालाचे वाटप केले

लॉक डाऊनमुळे सोनारी कौडगाव येथे पालीवर अडकलेल्या कुंटुबियांना महसुल प्रशासणाने किराणा मालाचे वाटप केले

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा तालुक्यातील सोनारी व कौडगाव येथे माढा तालुक्यातील पेनुर येथून आलेले मरीआई वाले पाल ठोकून भागात राहत आहेत कोरोनाच्या संकटामुळे या कुंटुबीयांची उपासमार होत असल्याची माहिती महसुल प्रशासाणाला मिळाली महसुल प्रशासणाने याची तत्काळ दखल घेऊन त्यांना उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना एसबीआयने दिलेल्या किराणा मालाचे किटचे वाटप नायब तहसीलदार मिलींद गायकवाड तलाटी मजहर जिनेरी कोतवाल विजयकुमार बनसोडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .
सोनारी व कौडगाव येथे एकूण १३ कुटुंब व त्यांची लोकसंख्या ५४ इतकी आहे
त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे
कोरोना संसर्गजन विषाणुमुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे संपूर्ण देश लॉक डाऊनमध्ये आडकुन पडले आहे . हातावर पोट असलेल्या या कुंटूबाकडे खाण्यासाठी कसलेही वस्तुन नाही आशी माहिती महसुल प्रशाणाला मिळाली असता महसुल पथकाने पालीवर जाऊन त्यांना किराणा वस्तुंचे पॅकिंग केलेले किटचे मोफत वाटप केले .
त्यांना आरोग्य तपासणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button