शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्याऱ्या बॅक आधीकाऱ्याना आमदार तानाजीराव सावंत यांनी झापले
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅक आधिकाऱ्यांना आमदार तानाजीराव सावंत यांनी चांगलेच झापले , असुन शेतकऱ्यांची अडवणुक केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दि २७ जुन रोजी अढावा बैठकीत बोलताना दिला .
तालुक्यातील जनतेच्या अडचणी जानुन घेऊन सोडवीण्या साठी दि .२७ जुन रोजी परंडा तहसिल कार्यालयात आमदार तानाजीराव सावंत यांनी आढावा बैठक घेतली या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत , शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष गौतम लटके , जिप चे कृषी व पशु संवर्धन सभापती दत्ता साळुंके , माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल , आण्णासाहेब जाधव , समीर पठाण , तहसिलदार अनिल कुमार हेळकर , गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ सयद , डॉ अबरार पठाण , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता मुंडे , पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद, विद्यूत वितरण कंपणीचे उप कार्यकारी अभियंता , एस बी .आय बॅकेचे व्यवस्थापक , सहाय्यक निबंधक ,कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
या वेळी आमदार सावंत यांनी नागरीकांच्या तक्रारी ऐकुन घेतल्या व सबंधीत विभागाच्या आधिकाऱ्यांना तात्काळ प्रश्न सोडवीन्याच्या सुचना दिल्या ,
या वेळी पिक कर्ज देण्या साठी बँका कडून अडवणुक होत असल्याच्या तक्रारी आल्याने बॅक अधिकाऱ्याला झापले व शेतकऱ्यांना वेळेत कर्ज वाटप करण्याच्या सुचना दिल्या .
या वेळी उप जिल्हाधिकारी निवड झालेल्या गायकवाड तर तहसिलदार पदी निवड झालेल्या रेणुका कोकाटे ,व नवोदय परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.






