Ausa

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत माता पालक मेळावा आणि हळदी – कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत माता पालक मेळावा आणि हळदी – कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

लातुर औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पाताई पाटील,तर प्रमुख पाहुणे म्हणून माता पालक संघाच्या भाग्यश्री कांबळे, अर्चना पाटील,अनिता यादव,जयश्री पाटील, जनाबाई समदडे या होत्या.
सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत माता पालक मेळावा आणि हळदी - कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्नयावेळी इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी दारूबंदी वरील नाटिका सादर केली,तसेच देशभक्तीपर व इतर गीतावर मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी उपस्थित महिलांच्या उखाणे व संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. व स्पर्धेतील विजेत्या महिलांना शाळेतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांची पुस्तके बक्षीस स्वरूपात देण्यात आली.

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत माता पालक मेळावा आणि हळदी - कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्नकार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका संतोषीमाता विश्वनाथ लोहार, व आभारप्रदर्शन अनुराधा कनामे यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मोहनराव मोरे ,सेविका स्वाती बिराजदार शाळेचे सर्व विद्यार्थी व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button