महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस सेवा फोंडेशन तफै शिक्षणिक साहित्य वर्षभर विनामुल्य जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांची माहिती.
शब्बीर खान यावल
यावल : कोरोना काळात ज्यांचे आई वडील मृत्युमुखी पडले असतील अशा संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांना त्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फौंडेशन आणि दीपस्तंभ युथ फौंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुरविले जाईल. तरी जळगाव जिल्ह्यातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा आणि जिल्ह्यातील सेवाभावी संस्था सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, महिला, युवक कार्यकर्ते, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रा. पं. सदस्य तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवर यांनी आपापल्या परिसरातील गावातील, शहरातील मुलांची माहिती नाव गरजूंना मिळणारी मदत त्यांच्या पर्यंत पोहचणे कामी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तसेच काँग्रेस सेवा फौंडेशन कोविड 19 कंट्रोल रुमचे जिल्हाप्रमुख जलील पटेल यांनी कळविले आहे .. जळगाव जिल्ह्यातील नोंदणी साठी संपर्क भ्रमध्वनिवर संपर्क करावा व जलीलपटेल माजी सरपंच कोरपावली ता .यावल .जि . जळगाव , येथे भेट घ्वावी
टीप * सदर कोविड 19 च्या काळात ज्या मुलांच्या आई वडिलांचे निधन झालेले आहे त्यांना संपूर्ण शैक्षणिक मदत मिळेल आणि याची नोंदणी निःशुल्क आहे तसेच कोणाकडून ही या उपक्रमासाठी दानशूर व्यक्तीकडून आर्थिक मदत घेतली जाणार नाही. ती जर वस्तू स्वरूपात असेल तरच घेतली जाईल उदा. वह्या,पेन, पेन्सिल पुस्तक, कंपास, रबर नोटबुक किंवा इतर शैक्षणिक साहित्य देणार आहे.






