गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सवाला सुरवात
चिमूर ( प्रतिनिधी ) ज्ञानेश्वर जुमनाके
चिमुर तालुक्यातील व नेरी येथून जवळच असलेल्या गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सवाला दि.६ जानेवारी पासून सुरवात झाली आहे.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील नेरीवरुन दक्षीनेस असलेल्या गोंदेडा या जंगलव्याप्त अरण्य भागात राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी घोर तपश्चर्या करुन संपूर्ण विश्वातील मानव जातील मानवतेचा संदेश या तपोभूमीत ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहून दिला
ब्रम्हलिन वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांचे पद स्पर्शाने पावन झालेली भुमी गोंदेडा ,या परिसरात असलेल्या गुंफेत त्यांनी तपसाधना करुन साऱ्या विश्वाला मानवतेचा संदेश दिला त्यांच्या लोकोपयोगी कार्यात प्रेरणा देणारी भुमी म्हणजे गोंदेडा, राष्ट्रसंतांनीच या भुमीत १९६१ ला यात्रा महोत्सव सुरू केला तसेच सन १९६१-१९६८ पर्यंत यात्रा कालावधीत तिन्ही दिवस स्वतः उपस्थित राहुन यात्रा संपन्न केली या यात्रा महोत्सवाला ५९ वर्ष झालेली आहेत व या वर्षी “६० वा गुंफा यात्रा महोत्सव” खालील कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येत आहे
या तपोभूमीत ६ जाने २०२० ते १० जाने २०२० पर्यंत चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाचा समारोप १० जानेवारीला गोपाल काला आणी भोजन दानाने होणार आहे.
या कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे. दि.६ जाने ला.सकाळी ५ वा.ग्रामसफाई ५.४५ वा सामुदायिक ध्यान विचार प्रकटन गुलाब महाराज खातोडा सदस्य गुं या.महो समिती गोंदेडा, ७ वा रामधुन नंतर विचार प्रकटन विठ्ठल राव वाढई करणार सकाळी ८ वाजता घटस्थापना व कार्यक्रम मंचाचे उद्घाटन होणार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल सावरकर अध्यक्ष गुंफा समिती, उपाध्यक्ष सुरेश ईंगुलकर,कोषाध्यक्ष प्रशांत मगरे,सदस्य चंदन सोनुने,रामदास जांभुळे,परशुराम नन्नावरे, गिरीश भोपे,राजेंद्र धारणे सरपंच गोंदेडा, विष्णु मगरे पो.पा.गोंदेडा, भास्कर कंकीरवार,सुधाकर चौधरी, मानीक वाढई,सर्व कार्यकारिणी सदस्य, गुरुदेव भक्त व समस्त ग्रामवासी उपस्थित राहणार आहेत
त्यानंतर ९ वाजता श्रमदानाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे १० वाजता पशु रोगनिदान शिबिराचे आयोजन केले आहे.संयोजक आहेत डॉ. जांभुळे साहेब पशु.वै.अधिकारी प.स.चिमुर व सहकारी सुनील पिसे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे
११ वाजता क्रीडा स्पर्धा कबड्डी होणार आहे उद्घाटक देवाडे सर मुख्याध्यापक गुरुदेव विद्यालय गोंदेडा यांचे हस्ते होणार आहे
या शिबिराला उपस्थित म्हणून चंद्रशेखर दोडके,मांदाडे सर,कामडी सर,संयोजक म्हणून अनिल गुरनुले सर,खोब्रागडे सर,संजु धारणे,मिलिंद वाढई,कन्हैयासिंग भौंड हे राहणार आहेत
दुपारी ३ वाजता ग्रामगीता पाठांतर स्पर्धा संयोजक आहेत ईश्वर पाटील धानोडे,केशवराव मसराम, आत्माराम आंबोरकर,साय.६ वा.सामुदायिक प्रार्थना विचार प्रगटन करणार सुरेश नामदेव डांगे सर गोंदेडा, साय.९ वाजता संकेत काळे महाराज अमरावती यांचे किर्तन साथसंगत गुरुदेव भजन मंडळ गोंदेडा खातोडा यांची राहणार
मंगळवार दि ७ जाने ला सकाळी ५ वाजता ग्रामसफाई, नंतर सामुदायिक ध्यानावर विचार प्रकटन दामोधर दडमल यांचे, ७ ,वा.रामधुन वर विचार प्रकटन नीलकंठ लोनबले यांचे ९ वा.श्रमदान, १० वा क्रीडा स्पर्धा १२ वा पर्यावरण विषयक जनजागृती संयोजक प्रा.आत्माराम ढोक महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर काँलेज मिंडाळा त.नागभीड
सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेवर विचार प्रकटन हभप प्रेमदास मेंढुलकर सर पेंढरी त्यानंतर ८ वा.भजन स्पर्धा उद्घाटक आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे हस्ते, सह उद्घाटक रघुनाथ धारणे ,नामदेव घोडाम,शंकर बावणे,दोलत घरत,संयोजन भरत जांभुळे,वसंता घोडाम,कचरुजी वाढई यांचे आहे सायं.८.३० वा.सांस्कृतीक कार्यक्रम होत आहेत सादरकर्ते आहेत महात्मा फुले- डॉ बाबासाहेब आंबेडकर काँलेज मिंडाळा त.नागभीड,
बुधवार दि.८ जाने ला पत्रीकेतील वेळेनुसार ग्रामसफाई,सामुदायिक ध्यान विचार प्रकटन, श्रमदान, सकाळी १०.३० वाजता नेत्र रोगनिदान शिबिर डॉ ए के शुक्ला नेत्र विभाग प्रमुख कस्तुरबा हाँँस्पीटल नेत्रतज्ञ चमु सेवाग्राम वर्धा,११ वा क्रीडा स्पर्धा,दुपारी १ वाजता महिला मेळावा तथा महिला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत प्रमुख पाहुणे म्हणून सौ.ममता ताई डुकरे जि.प.सदस्या चंद्रपूर, सौ.गिताताई कारमेंगे पं.स.सदस्य, सौ.लताताई पिसे पं.स सभापती ,मार्गदर्शक म्हणून सुमीत्रा बाई चौखे,रज्जुताई ठाकरे, रजनीताई घुगरे,वनिताताई अनिल गभणे,सविता झाडे-पिसे मँडम,प्रमुख उपस्थिती शारदा शिरभैय्ये,रत्नमाला सोनुले,गिरजा गायकवाड, गिताबाई गजभे सर्व सदस्य ग्रा.पं गोंदेडा, विमलताई सूर्यवंशी, संयोजक करुणाताई गुरनुले,नम्रता नान्हे मँडम,सौ शोभाताई धारणे,सूत्रसंचालन कु.नुतन चरणदास गजभे,कु.योगीता हरीदास गजभे सांभाळणार आहेत,सायं ६ वा.सामुदायिक ध्यान विचार प्रकटन,सायं ८ वा.हभप कचरे महाराज फुबगाव जि.यवतमाळ यांचे किर्तन ,रात्रो १० वा.भजन स्पर्धा,
गुरुवार दि.९ जाने ला नित्यनेमाप्रमाने ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, विचार प्रकटन,रामधुनवर विचार प्रकठन, श्रमदान, सकाळी १० वा.आरोग्य शिबिराला उपस्थित डॉ दिलीप शिवरकर,डॉ. जगदीश पिसे,डॉ नानाजी खोब्रागडे, डॉ भास्कर कांकिरवार,सकाळी १२ वाजता श्रमसंस्कार शिबिर तथा गुरुदेव कार्यकर्ता मेळावा व सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सहभाग असणार आहे परिसरातील सर्व शाळांचे शिक्षक तथा विध्यार्थी ,मार्गदर्शक म्हणून डॉ. सतीशभाऊ वारजुकर गट नेता जि.प.चंद्रपूर, शांताराम सेलवटकर उपसभापती पं.स.चिमुर, गजानन बुटके जि.प.सदस्य चंद्रपूर, रमाकांत लोधे,जि.प.सदस्य, राजुभाऊ देवतळे,जिवन प्रचारक गुरुकुंज मोझरी,डॉ. शामजी हटवादे, शेखर यादव हे राहणार आहेत, उपस्थीतांनमध्ये कमल असावा, निलकंठ काटेखाये,गणेश बारेकर,वामन भरडे,कनिराम सातपुते,मधुकर वाढई,क्रुष्णा वसाके,विनोद हटवादे, यामध्ये संयोजक आहेत किशोर कोडापे सर,भक्तदास जिवतोडे,सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना यावर विचार प्रकटन करणार प्रा.राम राऊत सर ग्रामगीता चार्य,रात्रो ७ वाजता ” स्वर गुरुकुंजांंचे ” गुरुकुंज मोझरी यांचा संगीतमय भजनाचा कार्यक्रम ,रात्रो ९.३०. वा.रामेश्वर खोडे महाराज ईसापुर ता. दिग्रस जि.यवतमाळ यांचे किर्तन, रात्रो ११.३० वा.भजन सम्मेलन परिसरातील श्री गुरुदेव भजन मंडळ तसेच पालखी सोबत आलेले सर्व भजन मंडळ (आलेल्या गुरुदेव भजन मंडळींनी संयोजकाकडे नोंद करुन घ्यावी अन्यथा भजन स्पर्धेत सहभागी मंडळांना भजन संम्मेलनात सहभागी होता येणार नाही) यामध्ये संयोजक म्हणून भाऊराव वाढई,प्रशांत अंदनसरे,अजय चांदेकर, पांडुरंग अडसोडे,यामध्ये सहभागी भजन मंडळास रोख पुरस्कार देण्यात येणार आहे
गोपाल काला १० जानेवारी २०२० रोज शुक्रवार ला
शुक्रवार दि.१० जाने ला सकाळी ग्रामसफाई, सामुदायिक ध्यानावर विचार प्रकटन रवींद्र कुमार गुरूजी यांचे,७ वा.रामधुन व पालखी मिरवणूकीवर विचार प्रकटन प्रा.अशोक चरडे सर यांचे ,सकाळी८.३० वा ध्वजारोहण सुरेश ईंगुलकर यांचे हस्ते, सकाळी ९.०० वा.पालखी सत्कार सोहळा श्री गुरुदेव यात्रा महोत्सव समितीचे सर्व सदस्य गन यांचे हस्ते होणार,संयोजक आहेत हरीजी मेश्राम,रामभाऊ बारापात्रे,एकनाथ बोरकर,यामदास बारेकर,वामन बोरकर,नानाजी ननावरे, दिवाकर चाचरकर,सर्व पालखी मंडळांना विठ्ठल सावरकर अध्यक्ष गुं समिती यांचे तर्फे अभंगगाथा भेट देण्यात येईल
सकाळी ११.३० वाजता गोपालकाला संकीर्तन हभप लक्ष्मणदास काळे महाराज अमरावती यांच्या ओजस्वी वाणीतुन ,दुपारी २.३० वाजता गुंफा यात्रा महोत्सव समितीची निवडणूक लगेच मान्यवरांचे मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाशपंत वाघ महाराज,खासदार अशोक नेते चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र,देवरावजी भोंगळे अध्यक्ष जि.प.चंद्रपूर, रामदास आंबटकर आ.विधान परिषद, मितेश भांगडीया माजी आ.विधान परिषद, बंटीभाऊ भांगडीया आ.चिमुर विधानसभा क्षेत्र
विशेष उपस्थिती म्हणून लक्ष्मणराव गमे उपसर्वाधिकारी गुरुकुंज मोझरी, क्रुष्णाजी सहारे उपाध्यक्ष जि.प.चंद्रपूर, विध्या चौधरी सभापती पं.स.चीमुर, विठ्ठल सावरकर, रुपलाल कावळे,राजेंद्र धारणे सरपंच गोंदेडा, जितुभाऊ होले,मालुसाहेब वरोरा, अहवाल वाचन प्रा.प्रकाश सोनुले करणार,संपूर्ण सुत्रसंचालन प्रा.भास्कर वाढई सहसचिव सांभाळणार, आभार प्रदर्शन एन एस भोयर हे करणार आहेत
तसेच दि.३१ डिसें २०१९ ते ६ जाने.२०२० पर्यंत आत्मानुसंधान मौन साधना शिबीराला सुरवात झाली आहे तरी या गोंंदेडा गुंंफा यात्रा महोत्सवात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करुन यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदेव साधनाश्रम गुंफा यात्रा महोत्सव समिती ,गोंदेडा ता.चीमुर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.






