मनीष फिरले यास सुवर्णपदक..
सलीम पिंजारी तालुका यावल
Yawal : न्हावी ता यावल येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के एच फिरके यांचे कनिष्ठ बंधू व शाळेचे माजी विद्यार्थी विलास फिरके ह .मू. तलासरी , यांचे चि.मनिष विलास फिरके एम.टेक.केमिकल मध्ये (first rank ) आल्या बद्दल त्याचा गांधीनगर पंडीत दीनदयाळ पेट्रोलियम युनिव्हर्सिटी येथे सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.सदर सुवर्णपदक व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा पंतप्रधान नरेंद्र मोदी , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उद्योगपती मुकेश अंबानी, शिक्षण मंत्री या मान्यवरांच्या उपस्थितीत व माननीय सायंटिस्ट मंडळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . मनीष फिरके चे तलासरी सारख्या अतिदुर्गम भागात आदिवासी मित्रांसोबत 1ली ते 12 वि पर्यंत चे शिक्षण झाले आहे .आई सौ भारती फिरके माध्य – शिक्षिका आणि वडील डोंबिवली बँक मध्ये लिपिक पदावर कार्यरत आहे . मनीष फिरके च्या यशाबद्दल भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे, चेअरमन पी एच महाजन, सचिव हर्षद महाजन, सन्माननीय संचालक मंडळ, गुरुजनवर्ग ,सरपंच भारती चौधरी, उपसरपंच सतीश जंगले, दूध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, व्हाईस चेअरमन पराग वाघुळदे यांच्यासह ग्रामस्थां कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे .






