Ahamdanagar

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सुनील नजन

अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा ढोरजळगाव ता.शेवगाव येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ.राजश्रीताई घुले या होत्या तर अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या सौ हर्षदाताई काकडे या होत्या.यावेळी व्यासपीठावर दै.राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, बापुसाहेब पाटेकर, रामभाउ साळवे, मीना राहिंज,पोलिस निरीक्षक रामराव ढिकले,संजय कोळगे,कचरू चोथे,सरपंच रागिणी लांडे ,अनिल मडके,उपस्थित होते.पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श पुरस्कारचे वितरण करण्यात आले.पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले.आबासाहेब काकडे उद्योग समुहाच्या वतीने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. शिवशाहीर कल्याण काळेसह हमिद सय्यद यांनी शिवचरित्रावर पोवाडा सादर केला.याप्रसंगी सुनिता पालवे,अशोक तरसे सर,साईप्रसाद कुंभकर्ण, चाँद शेख,मनिषा लहारे,शितल भानगुडे,शिवकन्या घोरतळे,दादा दळवी, सविता साळुंके,भैय्या टेकमसर,बाबागीरी महाराज, रूषीकेश केदार,यांना आदर्श पुरस्कार प्रदान करून गौरवीन्यात आले.यावेळी अखिल भारतीय पत्रकार संघाच्या सर्व सदस्या सह मुख्याध्यापक अशोक बोरुडे,सौ.शांताबाई तरसे,महादेव तरसे,बबनराव देशमुख हे ऊपस्थीत होते.सुत्रसंचालन शंकर मरकड यांनी तर आभार दिपक खोसे यांनी मानले.प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button