DVP उद्योग समूहाचे चेअरमन श्री अभिजित पाटील यांच्या हस्ते गुळाच्या चहाचे उद्घाटन सोहळा संपन्न
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरामध्ये सचिन कदम यांनी सुरू कॆलेल्या “यादव गुळाचा चहा” शमियाना हाॅटेल जवळ,पंढरपूर येथे उदघाटन संपन्न झाले.
आज वेगवेगळ्या स्वरूपात चहाचे नवनवीन स्टाॅल पहावयास मिळतात. लोकांच्या जिभेवर राज्य करणाऱ्या चहाचे चाहते अधिक पाहण्यास मिळतात. तरूणाई पासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत चहाचा चांगलाच ट्रेंडचा बनलाय.यावेळी आबासाहेब यांनी गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला.
गुळाची बिस्किटे, गुळाची कोल्ड काॅफी, गुळाचा क्रिम रोल, गुळाची लेमन आईस टी, गुळाची ब्लॅक लेमन टी,आशा विविध प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले आहेत.कोरोनाच्या महामारीवर सक्षमरित्या उभं राहून युवा मित्र सचिन कदम यांनी उद्योग उभा केला त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी हभप संभाजी पवार, नगरसेवक,संजय बदपट्टे, सुधीर धौत्रे, शहाजी सांळुखे, समाधान फाटे, दत्तात्रय बागल, गणेश बागल, संतोष बोबडे,धनंजय बागल, सुहास बागल,नंदकुमार बागल, नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.






