Kolhapur

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला प्रथमेश निंबाळकर गंभीर जखमी,आर्थिक सहकार्याची गरज.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला प्रथमेश निंबाळकर गंभीर जखमी,आर्थिक सहकार्याची गरज.

सुभाष भोसले-कोल्हापूर

भुदरगड तालुक्यातील फणसवाडी (गारगोटी) येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा आपल्या कष्टाच्या जोरावर आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहत असतो. पण नियतीच्या पटावर मात्र काही वेगळंच लिहिलं गेलं होतं. मागील वर्षी खेलो इंडिया स्पर्धेत मजल मारणारा प्रथमेश यावेळी आपल्या कष्टाचं रुपांतर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या पदकात करण्याचं ध्येय बाळगलं होत. *चालू वर्षी इंफाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी प्रथमेश निंबाळकरची निवड झाली होती*. याचं स्पर्धेसाठी तयारी करत असताना नियतीने डाव साधला. सराव करतेवेळी तो मानेवरती पडला व मज्जारजूला मोठा मार बसला.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित लोकांनी त्याला कोल्हापूर येथील अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. कालच त्याच्या वरती मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रथमेश जरी मृत्यूच्या दाढेतून बचावला असला तरी त्यांची प्रकृती अजून खुपचं नाजूक आहे. आजतागायत हॉस्पिटलचा खर्च लाख रुपयांच्या पुढे गेला असून, प्रथमेश चे आई वडील शेतामध्ये मोल मजुरी करून आपला व घरचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलचा व औषध उपचारचा खर्च भागवणे अशक्य आहे.

*महाराष्ट्रातील तमाम क्रीडा शौकिनाना विनंती.*

ज्यावेळी अशा घटना क्रीडा क्षेत्रात घडल्या त्यावेळी राज्यातील तमाम क्रीडा शौकीन, समाजातील दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन प्रत्येकवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी देखील अशीच खंबीर साथ व मदत निंबाळकर कुटुंबियाना देण्याची गरज आहे. या संकटातून निंबाळकर कुटूंबियांना बाहेर काढण्यासाठी समस्त क्रीडाप्रेमी व समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या परीने जेवढी आर्थिकमद्दत करता येईल तेवढी मदत प्रथमेश निंबाळकर साठी केली पाहजे
संपर्क -धनाजी निबांळकर 7875257406

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button