Pandharpur

लॉकडाऊन काळातील निष्क्रीयता झाकण्यासाठीच लोकप्रतिनिधींचे आरोप नगराध्यक्षा भोसले यांचा पलटवार

लॉकडाऊन काळातील निष्क्रीयता झाकण्यासाठीच लोकप्रतिनिधींचे आरोप

नगराध्यक्षा भोसले यांचा पलटवार

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर- केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासून पंढरपूर नगरपालिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असल्यामुळेच आज शहर कोरोनामुक्त असल्याचे चित्र आहे. मात्र चांगल्या कामाचे कौतुक करायसाठी मोठ मन लागत ते जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी यांच्याकडे नसल्यामुळेच ते नगरपालिक विकली गेली आहे असा गंभीर आरोप करीत आहेत. वास्तविक कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात राजकारण करू नका असे मुख्यमंत्री वारंवार आवाहन करीत असताना लोकप्रतिनिधी मात्र जाणीवपूर्वक टीका करून आपली पन्नास दिवसापासूनची निष्क्रीयता झाकत आहेत.नगरपरिषदेचा कारभार प्रथम पासून पारदर्शक व लोकाभिमूष असल्यानेच जनतेने आम्हाला लोकशाही मार्गाने सत्तेवर बसविले आहे. मात्र तीनवेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेचा हा विश्‍वास जिंकता आला नसल्याची सतत सल टोचते. यामुळेच कोरोना सारख्या मोठा संकटात मतभेद, राजकारण बाजुला ठेवून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित असताना लोकप्रतिनिधी बिनबुडाचे आरोप करीत आहेत. याव्दारे सर्वसामान्य जनतेच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासूनच नगरपालिकेने महसूल, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या मदतीने शहरात विविध उपाययोजना राबविल्या आहेत. दोनवेळा शहर निर्जुंतीकरण केले असून प्रत्येक दुकानाची फवारणी केली आहे. एक लाख लोकसंख्या असणार्‍या शहरातील ९७ हजार नागरिकांची स्क्रिनिंग तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच राज्यात सर्वात प्रथम ऑक्सिमीटर तपासणी पंढरपूर नगरपालिकेने सुरू केली आहे. तर आशा वर्कस, नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या मदतीने प्रत्येक घरात जावून परगावच्या लोकांची यादी करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजनामुळेच आज शहर कोरोनामुक्त आहे. याचे साधे कौतुक देखील लोकप्रतिनिधी करू शकत नाही हे जनतेचे दुर्दैव आहे.अगदी सुरूवातीपासून नागरिकांनी शहरात गर्दी करू नये यासाठी प्रत्येक गल्ली बोळात दूध व भाजी विक्रीसाठी सोय करण्यात आली. यासाठी नगरपालिकेने दीडशेहून अधिक पास वाटले. तसेच आमदार प्रशांत परिचारक यांनी नगरसेवकांची बैठक घेवून प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची समिती स्थापून त्या व्दारे वृध्द, गरीब यांची विविध कामे मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या आजी माजी नगरसेवकांची बैठक घेवून प्रभागातील गरजू, गरीब यांना धान्य व भाजी वाटप करण्याची सूचना केली. या अंतर्गत दहा हजारहून अधिक कुटुंबांच्या घरात चुल पेटली. तेव्हां आपण कोठेच नव्हता. दरम्यान सरकारने तिसर्‍या लॉकडाऊन काळात दुकाने सुरू करण्यास थोडीफार शिथिलता दिली होती. याचे नियोजन करण्यासाठी व्यापारी व त्यांच्या प्रतिनिधींची नगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्व व्यापार्‍यांनी एकमुखाने दि.१७ मे पर्यंत शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यास नगरपालिकेने मान्यता दिली.

तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे शहरात सध्या ए,बी,सी,डी असे दुकानांचे वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये वशिलेबाजी झाली हे त्यांनी सिध्द करून दाखवावे. शहरातील व्यापार पेठ देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेवून जात असल्याचा त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचने वरूनच शेती माल व धान्याची वाहने आल्यावर ती निर्जुंतीकरण करण्यासाठी बाजार समितीमध्ये उभी केली जातात. गर्दी टाळण्यासाठी बाजार समितीमध्ये वाहने आणली जात असून यामध्ये देखील लोकप्रतिनिधींना राजकारण दिसत आहे.
अधिकारी, नगरसेवक व आमदार प्रशांत परिचारक यांच्या नियोजनामुळे आज शहर कोरोनामुक्त असून यास नागरिकांनी तेवढीच साथ दिली आहे. पंढरीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून येथील अनुकरण इतर तालुक्याने सुरू केले आहे. संपूर्ण लॉकडाऊन काळात हे लोकप्रतिनिधी गायब असल्यानेच आपली निष्क्रीयता झाकण्यासाठी बेछूट आरोप करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button