Pandharpur

? Big Breaking..राष्ट्रवादीचा भाजपला  झटका,नेते कल्याण काळे घड्याळ बांधणार ?

? Big Breaking..राष्ट्रवादीचा भाजपला झटका,नेते कल्याण काळे घड्याळ बांधणार ?

पंढरपूर: भाजपचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे कल्याणराव काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा आहे. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटले.
पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार आज सकाळी सरकोली येथे आले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.
कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.
कोण आहेत कल्याण काळे?

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधारराजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button