महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेता हनुमंत पुरी याचा आ. सुजितसिंह यांनी केला सत्कार
*महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता परंडा तालुक्यातील कंडारी (जि. उस्मानाबाद) येथील मल्ल हनुमंत पुरी याचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पुणे येथे भेट घेऊन सत्कार केला.*
सुरेश बागडे
परंडा ( सा.वा ) दि. ०६
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पुणे येथे झालेल्या ६३ वी वरिष्ठगट महाराष्ट्र केसरी २०१९-२० अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत हनुमंत पुरी याने ७९ किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळविले आहे. हनुमंत पुरी हा मुळचा कंडारी (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) येथील असून गेली पाच वर्षे तो मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, पुणे येथे सराव करीत आहे. यापूर्वीही कुस्ती स्पर्धेत मोठे यश मिळविलेला हनुमंत पुरी हा अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबातील असून आणखी मोठया यशाच त्याचे ध्येय आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी हनुमंत पुरी याचा पुणे येथील आखाड्यात त्याची भेट घेऊन फेटा बांधून शाल, पुष्पहार व बक्षीस देऊन सत्कार केला. आणि त्यास पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी हनुमंत पुरी याचे प्रशिक्षक वरूण त्यागी, मार्गदर्शक चंद्रशेखर धुमाळ व त्याचे सहकारी उपस्थित होते.






